Crocodile (Photo Credits: Unsplash/Representational Image)

उत्तराखंड (Uttarakhand) मधील हरिद्वार (Haridwar) जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर येत आहे. एका 8 वर्षांच्या मुलीचा (8-Year-Old Girl) मगरीच्या (Crocodile) हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाणगंगा येथे तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या 8 वर्षांच्या मुलीने मगरीने हल्ला केला. आजूबाजूच्या लोकांना काही कळायच्या आत मगरीने मुलीला तलावात फरफडत नेले. या घटनेची माहिती पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर शोधमोहिम सुरु झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, ही मुलगी पंडितपूर गावातील रहिवासी होती. आपल्या मोठ्या बहिणीसोबत बाणगंगा तलावाच्या किनारी फुलं वेचण्यास आली होती. बहिण एकीकडे फुलं वेचत असाताना ही मुलगी फुलं वेचण्यासाठी तलावाजवळ गेली. त्यावेळेस ही दुर्घटना घडली. काही तासांच्या शोधानंतर मुलीचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, दुपारच्या वेळेस ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह हाती लागण्यास खूप तास लागले. मगरीने मुलीला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटवत नेले होते, अशी माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे. (Watch Video: एका तरुणाने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले हैराण)

या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मगर मुलीला पाण्यात खेचून घेऊन गेली होती. मात्र तिने तिला खाल्ले नव्हते. हे तलाव मोठे असून याची लांबी सुमारे 1.5 किमी इतकी आहे. तसंच दलदलीचे तलाव असल्याने मगरीला शोधणे शक्य झाले नाही. परंतु, शनिवार पासून मगरीचा शोध पुन्हा सुरु करण्यात आला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू)

दरम्यान, उत्तराखंड राज्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेकदा नदीतील मगरी गावात देखील येतात. यावर्षी जून महिन्यात राज्याच्या वनविभागाने जाहीर केलेल्या वन्यजीव जनगणनेनुसार राज्यात मगरींच्या संख्येत वाढ झाली आहे. 2008 साली मगरींची संख्या 123 होती. 2020 मध्ये ती 451 झाली आहे.