COVID Jab Using Fake Arm: आरोग्य कर्मचाऱ्याला फसवण्यासाठी व्यक्तीने लढवली शक्कल, बनावट हात लावून लस घेण्यासाठी झाला दाखल
Vaccine | Representational Image | (Photo Credits: Flickr)

COVID Jab Using Fake Arm: कोरोनाच्या विरोधात जगभरात लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. एका बाजूला लसीकरण करुन घेत लोक कोविड19 च्या विरोधातील लढाईत आपले योगदान देत आहेत. तर दुसऱ्या बादूला काहीजण लस घेण्यासाठी अद्याप घाबरत आहेत. याच दरम्यान इटली येथील एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. तर व्यक्तीला लस न घेता कोविड19 च्या लसीकरणाचे सर्टिफिकेट हवे होते. म्हणून त्याने एक अनोखी शक्कल लढवली. त्याने आपल्याच हातावर एक बनावट हात लावून तो लस घेण्यासाठी पोहचला. परंतु त्याची ही शक्कल काही कामी आली नाही.

व्यक्तीने आपला खरा हात लपवून ठेवण्यासाठी त्यावर सिलिकॉनचा मोल्ड लावला होता. त्याच हाताने तो लस घेण्यासाठी सुद्धा पोहचला. परंतु नर्सने त्याची ही चालाखी पडकली आणि त्याबद्दल पोलिसांना सांगितले. नर्सने स्थानिक मीडियाला सांगितले की, व्यक्तीने लस घेण्यासाठी हात दिला असता तेव्हा त्याची त्वचा रबरदार आणि थंड असल्याचे जाणवले. जेव्हा कळले की हा बनावट हात आहे तेव्हा तिने थेट पोलिसांनाच सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(Private Part मध्ये घुसला बॉम्ब, भीतीने रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाला पाहून घाबरले डॉक्टर)

सदर व्यक्ती हा सुद्धा आरोग्य कर्मचारी होता. परंतु त्याला त्याच्या नोकरीवरुन निलंबित करण्यात आले होते. कारण त्याने लस घेतली नव्हते. तर इटलीत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे अनिवार्य आहे. दरम्यान, ही घटना नियम अधिक कठोर करण्यापूर्वी घडली आहे. इटलीत स्विमिंग पूल, सिनेमागृह, रेस्टॉरंट, रेल्वे स्थानकात जाण्यासाठी ग्रीन पास अनिवार्य केला आहे. त्यानुसार त्यांना लसीकरण प्रमाणपत्र, नकारात्मक चाचणी रिपोर्ट दाखवणे गरजेचे आहे.

नुकत्याच काही आठवड्यात अनेक इटालियन शहरांमध्ये लस पास नियमांमुळे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 73 टक्‍क्‍यांहून अधिक इटालियन लोकांना कोविड विरूद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. इटलीमध्ये लसीकरण फ्रान्स किंवा यूकेपेक्षा जास्त आहे, परंतु स्पेन आणि पोर्तुगालच्या तुलनेत इटलीमध्ये लसीकरण कमी आहे.