Private Part मध्ये घुसला बॉम्ब, भीतीने रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाला पाहून घाबरले डॉक्टर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File)

एखादा अपघात कधीही होऊ शकतो. कारण त्यावर कोणीही नियंत्रण करु शकत नाही. परंतु काही घटना अशा असतात की त्या पाहून भल्याभल्यांच्या भुवया ही उंचावल्या जातात. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. तर इंग्लंड येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बॉम्ब घुसला गेला. परंतु जेव्हा तरुण रुग्णालयात तो काढण्यासाठी गेला असता तेव्हा डॉक्टर सुद्धा ते पाहून हैराण झाले. त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून काढलेला बॉम्ब वर्ल्ड वॉर-2 मधील असल्याचे सांगितले जात आहे. त्याला लगेच डिफ्युज ही करण्यात आले.

सदर घटना 2 सप्टेंबर रोजीची आहे. जेव्हा तरुणाला रुग्णालयात प्रायव्हेट पार्टमध्ये बॉम्ब घुसल्याच्या कारणास्तव दाखल केले असता सर्वजण घाबरले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेला तरुण हा सैनिकांच्या परिवारातील होता. घराच्या साफसफाईवेळी तो घरात ठेवलेल्या या बॉम्बवर पडला. बॉम्ब उभा करुन ठेवला होता. त्याच कारणामुळे तो त्याच्या थेट प्रायव्हेट पार्टमध्ये घुसला. वेदना होत असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करत बॉम्ब डिफ्यूज करणाऱ्या टीमला बोलावण्यात आले.(Miss BumBum 2021: मॉडेलने 13 कोटी खर्चून उतरवला आपल्या 'या' अवयवाचा विमा; जाणून घ्या काय आहे खास)

रिपोर्ट्सनुसार, बाहेर काढण्यात आलेला बॉम्ब रॉयल आर्टिलरी द्वारे दुसऱ्या महायुद्धात वापरला गेला होता. त्यानंतर तो नॉर्थ अफ्रिकेच्या ब्रिटिश टँक्सने सुद्धा वापरला. तो जवळजवळ 57mm गोलाकार आणि 170mm लांब असतात. द सन यांना मिळालेल्या माहितीनुसार, साफसफाईच्या दरम्यान तरुणाला तो एका बाजूला पडल्याने त्याने तो उभा करुन ठेवला. परंतु त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो त्याच्यावरच पडला. तर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो डिफ्यूज केला. त्यानंतर प्रायव्हेट पार्टमधून काढल्यानंतर तरुणाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. तरुणाला यामधून बरे होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु सोशल मीडियात हे प्रकरण खुपच व्हायरल होत असून युजर्सकडून विविध प्रतिक्रिया ही दिल्या जात आहेत.