सहसा लोक त्यांच्या घराचा, कारचा किंवा आरोग्याचा विमा उतरवतात. पण ब्राझीलच्या (Brazil) एका मॉडेलने आपल्या शरीराच्या अशा एका भागाचा विमा उतरवला आहे, ज्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. या मॉडेलने तब्बल 13 कोटी खर्चून आपल्या बटचा (Buttocks) म्हणजेच नितंबांचा विमा उतरवला आहे. मॉडेलने एक मोठे विजेतेपद जिंकल्यानंतर तिच्या पार्श्वभागाचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलची मॉडेल नथी किहारा (Nathy Kihara) हिला सर्वात तरुण मिस बमबम वर्ल्ड (Miss BumBum 2021) म्हणून निवडण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षीय मॉडेल नथी किहाराने अलीकडेच मिस बट वर्ल्ड 2021चा खिताब जिंकला आहे.
इंस्टाग्रामवर सर्व स्पर्धकांपैकी सर्वाधिक पसंती (मते) मिळविल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड म्हणून निवडले गेले. हे विजेतेपद पटकावल्यानंतर किहाराने तिच्या बटचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने 1.3 मिलियन पौंड (12 कोटी 95 लाख रुपये) खर्च केले आहेत. ही ब्राझिलियन मॉडेल म्हणते, ‘मी माझ्या बटसाठी प्रसिद्ध आहे. मी त्याबाबत विजेतेपदही जिंकले आहे. त्यामुळेच मी त्याचा विमा उतरवला आहे.’ किहारा सांगते की ती अजूनही तिच्या नितंबाच्या आकाराबद्दल समाधानी नाही व व्यायामाद्वारे त्यांचा आकार मोठा करण्याची तिची योजना आहे.
किहाराचे नितंब सध्या 126-सेंटीमीटर आहेत. बटचा आकार 130cm करणे हे तिथे ध्येय आहे. नथी म्हणते, ‘माझे नितंब पूर्णपणे नैसर्गिक आहे व मी माझे शरीर योग्य आकारात ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते.’ नथी ही दोन मुलांची आई आहे. तिला एक नऊ वर्षांचा मुलगा आणि काही महिन्यांची एक मुलगी आहे. तिने सांगितले की मुलीला जन्म दिल्यानंतर तिने जिममध्ये वजन उचलण्यापेक्षा तिच्या आहाराकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: दिल्लीतील एका मुलीच्या स्कूटीची नंबर प्लेट ठरलीये त्रासदायक, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?)
दरम्यान, नथी किहाराचे जगभरात खूप चाहते आहेत. तिच्या बोल्ड अवतारामुळे ती तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिने अनेक बोल्ड फोटोज शेअर केले आहेत, ज्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. विजेतेपद पटकावल्यानंतर तिने एक फोटो अपलोड केला होता, जो व्हायरल झाला होता.