Yogi Adityanath leading ritual in Ayodhya amid lockdown (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगलवारी रात्री आठ वाजता संपूर्ण देशाला संबोधित केले. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन (Lockdown) करत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, कोणत्याही स्थितीत गर्दी टाळा असे अवाहनही जनतेला केले. असे असताना उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मात्र काही लोकांना सोबत घेऊन धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. योगी आदित्यनाथय यांनी लखनौ येथील रामलला मूर्ती स्थापना विधीत कार्यक्रमात भाग घेतला. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डीस्टंस ठेवण्याचे नागरिकांना अवाहन केले आहे. असे असताना योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. प्राप्त माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये कोरोना व्हायरस बाधित नागरिकांची संख्या 35 इतकी आहे.

योगी आदित्य यांनी भल्या सकाळी एक ट्विट करत म्हटले आहे की, आयोध्या अवाहन करते आहे. भव्य राममंदिर उभारण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम त्रिपाल येथून नव्या आसनावर विराजमान. मानस भवन जवळ एका अस्थायी रुपात 'रामलला'ची मूर्ती स्थानांतरीत करण्यात आली. भव्य मंदिर निर्माण कार्यक्रमासाठी 11 लाख रुपयांचा चेक दिला. (हेही वाचा, Fact Check: मुंबईमध्ये संचार बंदी दरम्यान दूध, भाजीपाला, किराणा दुकानांच्या वेळेवर निर्बंधाच्या बातम्या खोट्या; मुंबई पोलिसांनी WhatsApp वर फिरणार्‍या अफवांबाबत केला खुलासा)

ट्विट

ट्विट

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या या कार्यक्रमामुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही त्यांच्यावर निषाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला रिट्विट करत अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केले आहे.