COVID19 संकटकाळात भुकेलेल्या मुलांसाठी अन्न नाही म्हणुन दगड उकळवले! केनिया मधील विधवा महिलेची हृदय पिळवटून टाकणारी व्यथा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संकटाने सर्व जगाला आपल्या विळख्यात अडकवले आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि सरकार अतोनात मेहनत करत आहे, मात्र तरीही या संकटाने पीडित जनतेची संख्या काही कमी होत नाहीये. केवळ कोरोनाची लागण झालेलेच नव्हे तर हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर सुद्धा याचा मोठा परिणाम झाला आहे. केनिया (Kenya)  मधील एक विधवा महिला पेनिना बहाटी किट्सओ आणि तिचे कुटुंब सुद्धा या पीडितांपैकी एक आहे. या कुटुंबाची एक हृदय पिळवटून टाकणारी व्यथा सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमातून दाखवली जात आहे. किट्सओ यांच्याकडे मुलांना खाऊ घालायला अजिबात अन्नधान्य नसल्याने शेवटी त्या मुलांना आपली आई जेवण बनवतेय असा भास करून देण्यासाठी त्या दगड उकळवत बसल्या आहेत. Coronavirus Lockdown: अरुणाचल प्रदेशात लॉकडाउनच्या काळात शिकाऱ्यांकडून किंग कोब्रा जातीच्या सापाची हत्या

BBC च्या माहितीनुसार, किट्सओ या लोकांच्या घरी कपडे धुण्याचे काम करत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीची एका टोळीकडून हत्या करण्यात आली होती, त्यांना एकूण आठ मुले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचे काम बंद आहे. परिणामी पगार नाही आणि म्ह्णूनच खायला सुद्धा काहीही मिळत नाहीये. अशावेळी त्यांची ही व्यथा त्यांची शेजारी प्रिस्का मोमॅनी यांनी माध्यमांना कळवली आणि त्यांनंतर हा प्रकार सर्वांसमोर आला. तिची अवस्था केनियातील अनेकांपर्यंत पोहचली आणि या नागरिकांनी तिला मदतीचा हात देत त्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केली आहे.

यावर किट्सओ यांनी प्रतिक्रिया देताना “मला विश्वास नव्हता की केनियातील लोक हे इतके प्रेमळ प्रेम आहेत असे म्हंटले आहे . मला देशभरातून फोन आले आणि त्या सर्वांनी मदत कशी करता येईल याविषयी विचारणा केली असेही किट्सओ यांनी सांगितले आहे.

दरम्यान आश्चर्याची बाब अशी की कोरोना संकटकाळात केनिया सरकारने एक आहार कार्यक्रम सुरू केला आहे. पण तो अद्याप किटसाओ सारख्या अनेकांपर्यंत पोहचला नाहीये, ही बातमी समोर येताच काऊन्टीचे अधिकारी आणि केनिया रेडक्रॉसही किट्सओला मदत करण्यासाठी आले. यांनतर त्या परिसरातील अधिक घरांना मदत अन्न योजनेचा फायदा होईल. अशीही अपेक्षा आहे. दुसरीकडे ताज्या आकडेवारीनुसार, केनियामध्ये कोरोनाव्हायरसचे 411 पुष्टी झाल्या असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.