माणसाकडून माणसाला होणाऱ्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाबाबत आपण पाहिले, वाचले ऐकले असेल. परंतू प्राण्यांना होणाऱ्या कोरोना संसर्गाबाबत आपण ऐकले आहे काय? अपवाद फक्त मध्यंतरी 'वाघाला झाला कोरोना' यांसारख्या वृत्ताचा. नाही ना? पण वैज्ञानिकांनी आता एक नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये चक्क आता कोरना व्हायरस संक्रमन कुत्रा (Dogs) आणि मांजर (Cats) यांसारख्या प्राण्यांनाही होऊ शकतो, असे म्हटले आहे. दरम्यान, कुत्रा आणि मांजर आदी प्राण्यांमध्ये निसर्गत:च एक प्रतिकारशक्ती (Immune System) विकसित झालेली असते. त्यामुळे कोरोना व्हायरस लस निर्मितीत कुत्रा, मांजर यांच्यावर प्रयोग करुन पाहावा असेही काही संशोधकांना वाटते.
दरम्यान, काही संशोधकांनी मत मांडले आहे की, अद्याप असाही काही ठोस पुरावा पुढे आला नाही की, पाळिव प्राण्यांपासून (Pet Animals) कोरोना व्हयरस संसर्ग मानवाला झाला आहे. परंतू संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कुत्री, मांजरांना कोरोना संसर्ग होऊ शकतो आणि मांजरं, कुत्री एकमेकांना कोरोना संक्रमित करु शकतात. परंतू, गंमत अशी की कुत्री मांजर यांना होणाऱ्या कोरोना संसर्गाबाबत वेगवेगल्या संशोधकांना वेगवेगळे परिणाम मिळाले आहेत. काही ठिकाणी कुत्री, मांजर यांना कोरना होतो आहे. परंतू, ते आजारी पडत नाहीत. काही संशोधकांनी म्हटले आहे की, कुत्रे आपल्या श्वसनातून कोरोना पसरवत नाहीत. (हेही वाचा, मुंबईमध्ये होणार मांजरांची नसबंदी; 1 कोटी रुपयांची तरतूद)
प्रोसीडिंग्स ऑफ द नेशनल अकादमी ऑफ सायन्सेज (Proceedings of the National Academy of Sciences USA) मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये लेखकाने म्हटले आहे की, पाळीव प्राण्यांमध्ये होणारे कोरोना व्हायरस संक्रमन हा चिंतेचा विषय नाही. बॉस्को-लूथ, एयरन ई हार्टविग, स्टेफनी एम पोर्टर आणि कोरोराडो स्टेट यूनिवर्सिटी चे कॉलेज ऑफ वेटरनरी मेडिसिन एंड बायोमेडिकल सायन्सेज आणि इतर संशोधकांनी म्हटले आहे की, जगभरात लक्षावधी लोक कोरोना व्हायरस संक्रमित आहेत. तर 1 मिलियन पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा ठिकाणी केवळ काहीच ठिकाणी पाळीव प्राण्यांमुळे कोरोना झाल्याचे आणि नागरिक संक्रमित झाल्याचे दिसते.
संशोधकांनी असाही निष्कर्ष काढला आहे की, कोरनाची अनुवांशिक बाधा होऊ शकते. नेदरलँडमधील एक संशोधक सांगतो की, घरामध्ये जर एखादा व्यक्ती कोरोना व्हायरस संक्रमित असेल आणि त्याच्याजवळ मांजर असेल तर कोरनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कोरोना संक्रमित व्यक्तीला रुग्णालयाद दाखल करवे लागू शकते.