डोक्याने जुळ्या असलेल्या सबाह आणि फराह यांनी पहिल्यांदा वैयक्तित बजावला मतदानाचा हक्क (Photos)
Conjoined sisters Saba and Farah cast their votes in Patna (Photo Credits: Election Commission/ANI Twitter)

बिहारची राजधानी पटना येथे जन्मलेल्या आणि डोक्याच्या भागाजवळ जुळ्या असणार्‍या बहिणींनी आज वैयक्तिक मतदानाचा हक्क बजावला. सबाह आणि फराह असं या मुलींचं नावं असून त्या 23 वर्षीय आहेत. समनपुरा परिसरात त्या राहतात. 2015 साली एकाच मतदान ओळखपत्रावर विधानसभा निवडणूकीसाठी त्यांनी मतदान केलं होतं. मात्र यंदा त्यांनी वैयक्तितरित्या मतदान केलं आहे. Lok Sabha Elections 2019 Phase 7:102 वर्षीय श्याम शरण नेगी ने बजावला मतदानाचा हक्क,नवरदेवही विवाहापूर्वी पोहचला मतदान केंद्रावर

सबाह आणि फराह या दोन वेगळ्या विचारांच्या व्यक्ती आहेत. त्यांची विचार, पसंती वेगळी आहे त्यामुळे त्या दोघींना मतदान करण्याचा वैयक्तिक हक्क असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने त्यांना तो हक्क दिला आहे.

ANI Tweet: 

शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळं करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र ही शस्त्रक्रिया कठीण असल्याने ते टाळले आहे.