Coin Removed From Nose After 50 Years: तब्बल 50 वर्षानंतर व्यक्तीच्या डाव्या नाकपुडीतून काढले नाणे, पहा हैराण करणारा व्हिडिओ
Coin Removed From Nose After 50 Years (Photo Credits-Youtube)

Coin Removed From Nose After 50 Years: रुस मधील एका 56 वर्षीय व्यक्तीचा नाकात गेल्या काही काळापासून त्रास होत होता. यामुळे जेव्हा त्या व्यक्तीने नाकाची चाचणी केली असता एक धक्कादायक बाब उघडकीस आली. या घटनेमुळे डॉक्टर्स सुद्धा थक्क झाले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या डाव्या नाकपुडीत गेल्या 50 वर्षापासून एक नाणे अडकले होते. मात्र डॉक्टरांनी आता हे नाणे शस्रक्रिया करुन बाहेक काढले आहे. सदर व्यक्ती जेव्हा 6 वर्षाचा होता तेव्हा त्याने आपल्या नाकात नाणे टाकले होते. मात्र नाकात नाणे गेल्याचे आईला कसे सांगणार यामुळे तो घाबरला होता.(मूत्र कुठून येते हे जाणून घेण्यासाठी एका १३ वर्षीय चीनी मुलाने त्याच्या गुप्तांगात घातली 2 फूट धातुची वायर)

हैराण करणारी गोष्ट म्हणजे व्यक्तीला आपल्या नाकात गेल्या 50 वर्षापासून एक नाणे अडकले याचा विसरच पडला होता. पण जेव्हा त्याला श्वास घेण्यास होऊ लागला तेव्हा हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्तीच्या नाकपुडीचे स्कॅन केले असता तेथे त्यांना एक ब्लॉकेज मिळाले. वैद्यकिय रिपोर्टनुसार, रायनोलिथ्स नाण्याभोवती काही दगडासारखे दिसले.(Anaconda Viral Video: ब्राझीलमध्ये नदी पार करणाऱ्या 50 फूट एनाकोंडा चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे यामागचं सत्य)

येथे पहा व्हिडिओ:

सुदैवाने डॉक्टरांनी रुग्णाच्या नाकातून दगड आणि नाणे काढण्यासाठी जी इंडोस्कोपिक सर्जरी केली ती यशस्वी झाली. जेव्हा ते काढले गेले तेव्हा नाणे सोवियत रुसचे चलन असल्याचे समोर आले. ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्णाला घरी पाठवले गेले. त्याचसोबत आता रुग्ण पूर्णपणे बरा असून त्याला श्वास घेण्यास समस्या उद्भवत नाही आहे.