Anaconda Viral Video (Photo Credits: Twitter)

Anaconda Viral Video: एनाकोंडा साप (Anaconda Snake) आपल्या प्रचंड मोठ्या आकारामुळे ओळखला जातो. परंतु, तुम्ही कधी 50 फूट एनाकोंडा (50 Feet Anaconda) पाहिला आहे का? ब्राझीलमधील झिंगु नदीतून (Xingu River) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, 50 फूट एनाकोंडा पोहूण नदी पार करत आहे. मात्र, हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना एनाकोंडाच्या आकारावरून प्रश्न पडत आहेत. हा व्हिडिओ खरा आहे का? नदीत तरंगत असलेल्या या अ‍ॅनाकोंडाची लांबी खरोखर 50 फूट आहे? असे प्रश्न नेटीझन्सला पडले आहेत.

ट्विटरवर 'द डार्क साईड ऑफ नेचर' या अकाऊंटवरून एनाकोंडा नदीत पोहत असल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 'ब्राझीलच्या झिंगू नदीमध्ये 50 फूटांपेक्षा जास्त लांबीचा अ‍ॅनाकोंडा दिसला,' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सुमारे 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 944.8k नेटीझन्सनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये एनाकोंडा नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाताना दिसत आहे. एनाकोंडाची लांबी 50 फूट असल्याचे म्हटले जात आहे. परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. (हेही वाचा - Fact Check: COVID-19 या बॅक्टेरियामुळे Thrombosis हा आजार होतो आणि त्यावर Aspirin गोळी घेतल्याने उपचार होतो? जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागील सत्य)

50 फूट एनाकोंडाचा व्हायरल व्हिडिओ - 

खरा व्हिडिओ - 

दरम्यान, फॅक्ट चेकिंग वेबसाइट 'इट्स नॉनसेन्स' च्या माहितीनुसार, इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडिओ एप्रिल 2018 चा आहे. जो यूट्यूबवर 'जायंट अ‍ॅनाकोंडा क्रॉसिंग द रोड' या नावाने अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओची तुलना व्हायरल व्हिडिओशी केल्यानंतर हे समजतं की, अ‍ॅनाकोंडाची लांबी जास्त दर्शविण्यासाठी हा व्हिडिओ स्ट्रेच करण्यात आला आहे. या व्हिडिओचे डायमेंश बदलल्यानंतर, अ‍ॅनाकोंडाचा आकार मोठा दिसू लागतो. मूळ व्हिडिओ प्रत्यक्षात 2018 चा असून हा साप नदी नव्हे, तर रस्ता ओलांडताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर सापाचा स्ट्रेच केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.