मूत्र कुठून येते हे जाणून घेण्यासाठी एका १३ वर्षीय चीनी मुलाने त्याच्या गुप्तांगात घातली 2 फूट धातुची वायर
Doctors (Photo Credits: Pixabay)

चीनमधील एका मुलाने त्याचे मूत्र कोठून आले आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या गुप्तांगात दोन फूट लांब धातूचे वायर टाकला.तब्बल तीन महिन्यांनंतर नुकतेच ते शस्त्रक्रियेने ती वायर काढून टाकण्यात आलेली आहे.१३ वर्षीय मुलाने आपल्या गुप्तांगात धातुची वायर टाकल्यानंतर जेव्हा त्याच्या मूत्रवाटे रक्तस्त्राव होऊ लागला तेव्हा त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.त्यानंतर त्याच्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.जी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.आता तो आता दक्षिणेकडील चीनच्या डोंगगुआनमधील सॉन्ग लेक सेंट्रल रुग्णालयात दाखल आहे. ( Uttar Pradesh : 'आंटी' म्हणाली म्हणून महिलेने मुलीला केली मारहाण ; बाजारात झाला बराच ड्रामा ( Watch Video )

या घटनेने डॉक्टर ही आश्चर्यचकीत झाले जेव्हा त्यांनी 70 सेंटीमीटर धातुची तार मुलाच्या मूत्राशयाच्या आत एक्स-रे स्कैन मध्ये पाहिली. त्याने डॉक्टरांना सांगितले की जेव्हा त्याने ही वायर त्याच्या गुप्तांगात टाकली त्यानंतर त्याच्या लक्षात ाले की ती तो बाहेर काढून शकणार नाही तेव्हा त्याने ही गोष्ट लाजेने आणि घाबरून त्याच्या आई-वडिलांपासूनही लपवून ठेवली.त्याच्या शस्त्रक्रियेला एक तास लागला आणि सिस्टोस्कोप नावाच्या एका साधनाचा उपयोग करुन ती वायर बाहेर खेचण्यात आली.या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे प्रमुख चिकित्सक डॉ.कै चोंग्ये म्हणाले की , मी विचारही करू शकत नाही की मूत्रमार्गाद्वारे इतके लांब वायरआत जाऊ शकते. सुदैवाने, वायरने त्याच्या मूत्राशयात कोणतेही नुकसान केले नाही.

चीनमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.जूनमध्ये डीएओ या दक्षिण-पूर्व चीनच्या जियांग्झी प्रांतामधील 10 वर्षाच्या मुलाने त्याच्या मूत्राशयातून पाच फूट केबलची दोरी तब्बल 5 वर्षांनी बाहेर काढली होती.या शश्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे यूरोलॉजिस्ट डॉ. राव म्हणाले की,दरवर्षी चार ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या 20 ते 30 घटना घडतात.