Uttar Pradesh : 'आंटी' म्हणाली म्हणून महिलेने मुलीला केली मारहाण ; बाजारात झाला बराच ड्रामा ( Watch Video )
Thrashes (Photo CRedits: Pixabay/ Representational Image)

उत्तर प्रदेशमधील एटातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक महिला मुलीला मारहाण करीत आहे.त्याचे कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.मिळालेल्या माहितीनुसार, करवा चौथच्या निमित्ताने दुकानात बऱ्याच महिलांची गर्दी होती.दरम्यान तिथे उभ्या असलेल्या महिलेला जवळ उभे असलेल्या एका मुलीने मुलीने काकू म्हणजेच आंटी म्हटले.आणि तिथूनच या वादाला सुरवात झाली असे समजत आहे.त्यानंतर हा वाद इतका वाढला की तिथे मरहाणीला सुरवात झाली.जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण घटनाक्रम.(Paneer Tikka Funny Memes:अमेरिकेच्या कॉंग्रेसवुमन Pramila Jayapal यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत Kamala Harris यांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना 'पनीर टिक्का' म्हणून बनवलेल्या डिशवरून नेटकर्‍यांनी घेतली त्यांची शाळा; पहा मजेशीर मिम्स)

घटनाक्रमानुसार एटा जिल्ह्यातील बाबूगंज बाजारात करवा चौथच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जरा जास्त महिलांची गर्दी होती. इथल्या एका दुकानात काही महिला वस्तू घेत होत्या.तेव्हा तिथे असलेल्या एका मुलीने एका महिलेला आंटी असे संबोधले.आंटी ऐकल्यावर त्या महिलेला प्रचंड राग आला. आणि तिथूनच त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला.पण नंतर हे भांडण इतके वाढले की त्या महिलेने त्या मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.इतकेच नाही तर त्या महिलेने त्या मुलीचे केस पकडून तिला जोरदार मारहाण केली.

 

View this post on Instagram

 

ये वीडियो यूपी के एटा स्थित बाबूगंज की है जहां सोमवार को एक महिला को किशोरी ने आंटी कह दिया. ये सुनकर महिला को गुस्सा आ गया और वो अपना आपा खो बैठी. फिर क्या था..महिला ने भरे बाजार किशोरी को पीटना शुरू कर दिया. किशोरी को भी गुस्सा आया और दोनों ओर से मारपीट शुरू हो गई. किसी ने इस पूरी घटना का वीडियो बना लिया जो अब सोशल मीडिया पर वायरल हो रहा है.

A post shared by ABP News (@abpnewstv) on

दरम्यान तिथे उभे असलेल्या महिलांनी मुलीचा कसा तरी बचाव केला. या घटनेमुळे बाजारात चेंगराचेंगरी ही झाली.आणि नंतर तपास केला असता हा सगळा वाद 'आंटी' म्हटल्यावर सुरु झाल्याचे समजले.या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे.