CJI Bobde Spotted Checking Out Harley Davidson: जेव्हा भारताचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांना झाला हार्ले डेविडसन बाइक चालवण्याचा मोह (See Photos)
CJI Bobde spotted checking out a Harley Davidson bike | [Photo Credits: Twitter/@payalmehta100 (left), PTI (right)]

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) शरद अरविंद बोबडे (Sharad Arvind Bobade)  यांचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, या मध्ये बोबडे हे चक्क हार्ले डेविडसन (Harley Davidson) या Exclusive Bike वर बसलेले पाहायला मिळत आहेत, अर्थात देशातील सर्वोच्च पदांपैकी एकावर स्थित व्यक्तीचा हा अंदाज नेहमी पाहायला मिळण्यासारखी गोष्ट नसल्याने हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. यापूर्वी अनेकदा शरद बोबडे यांनी आपले बाईक प्रेम व्यक्त केले होते, त्यांना वेगवेगळ्या ब्रँड्सच्या बाईक चालवण्याची आवड आहे. सध्याचा हा फोटो नागपूर (Nagpur) मधील असून यात बोबडे हे 'Harley Davidson Limited Edition CVO 2020' ही बाईक चालवताना पाहायला मिळतायत. शरद बोबडे यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

शरद बोबडे यांच्या या फोटवर अनेकांनी कमेंट्स करून त्यांच्या या अंदाजाचे कौतुक केले आहे. मात्र दुसरीकडे या फोटो मध्ये बोबडे यांनी मास्क लावलेला दिसत नसल्याने अनेकांनी टीका सुद्धा केल्या आहेत.

पहा ट्विट

यापूर्वी शरद बोबडे यांना नागपूर च्या वीसीए स्टेडियम मध्ये क्रिकेट खेळताना सुद्धा पाहायला मिळाले हिते. अन्य न्यायाधीश आणि सीनियर बाकिलांसोबत बोबडे यांची मॅच रंगली होती. याशिवाय बोबडे यांना फोटोग्राफी ची सुद्धा आवड आहे.