प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

संंपुर्ण जगाच्या तुलनेत चीन मध्ये खाद्य संस्कृती जरा भलतीच आहे हे आपण जाणतो, किंंबहुना शक्यता खर्‍या मानल्यास कोरोनाच्या रुपात आता आपण या खाण्याचा परिणाम सुद्धा भोगत आहोत. किटक, प्राणी जिवंंत खाण्याचा प्रकार या प्रांंतात पाहायला गेल्यास जुना आणि कॉमन आहे, मात्र बहुदा अशाच काहीश्या सवयीमुळे घडलेला एक विचित्र प्रकार सध्या समोर येत आहे. चीन मधील रहिवाशी 23 वर्षीय चेन या तरुणाच्या मेंंदुतुन डॉक्टरांंनी 5 इंच लांंब अळी काढल्याचे समजत आहे. याच आठवड्यात 25 ऑगस्ट रोजी चीन मधील वुचांंग युनिव्हर्सिटी मध्ये चेन याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि ही अ‍ळी बाहेर काढण्यात आली. या विचित्र प्रकारानंंतर डॉक्टरांंनी अर्धे शिजलेले बेडुक व साप खाल्ल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकाराविषयी सविस्तर जाणुन घ्या.

उत्तर प्रदेश: झोपलेल्या व्यक्तीच्या पॅन्टमध्ये अचानक घुसला किंग कोबरा, Video मध्ये पहा पुढे काय झाले

चीन मधील रहिवाशी 23 वर्षीय चेन याला वयाच्या सहाव्या वर्षापासुन उजव्या बाजुचा हात आणि पाय बधीर झाल्याचा त्रास जाणवत होता, सुरुवातीला त्याच्या कुटुंंबाने हे अनुवंंशिक कमतरता असल्याचे मानत वैद्यकीय मदत सुद्धा घेतली नाही मात्र अलिकडे शरीराच्या उजव्या भागाच्या संवेदना गमावल्या गेल्यानंतर त्याने डॉक्टरांची मदत घ्यायचे ठरवले.

मांजरीमुळे महिला गरोदर? बायको प्रेग्नंट झाली म्हणून नवऱ्याने त्याच्या Ginger Tom ला ठरवले दोषी, वाचा नक्की काय आहे प्रकरण

17 वर्षांपासुन त्याला अनेकदा डोकेदुखी आणि मळमळ असा त्रास सुद्धा होत होता, अखेरीस जेव्हा त्याने डॉक्टरांंकडुन मदत घ्यायचे ठरवले तेव्हा शरिराचे स्कॅनिंंग केल्यावर 12 सेंटीमीटर (पाच इंच) लांंबीची अळी आढळुन आली. आता ऑपरेशन करुन ही अळी बाहेर काढल्यावर चेन सुरक्षित आहे असे डॉक्टरांंनी सांंगितले आहे.

दरम्यान यापुर्वीही अनेकदा असे काही प्रकार समोर आले होते, काही महिन्यांंपुर्वी एक इसम जीवंंत माश्यावर बसल्याने हा मासा त्याच्या गुदद्वारा मार्गे आत शिरल्याची घटना चर्चेत होती त्यानंंतर आता हा विचित्र प्रकार उघड झाला आहे.