मांजरीमुळे आपली बायको गर्भवती झाल्याचा आरोप एका व्यक्तीने लावल्याची विचित्र घटना समोर आली आहे. या व्यक्तीने असे म्हटले आहे की, गेल्याच वर्षात त्यांना पहिले मुल झाले असून त्यावेळी काही समस्या उद्भवल्या होत्या. मात्र या विवाहित जोडप्याला अजून एक मुल हवे असल्याने त्यांनी सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची गोष्ट अशी की कंडोम वापरले असले तरीही बायको गरदोर कशी झाली याचा प्रश्न आता नवऱ्याला सतावत आहे. तर कंडोम वापरण्यापूर्वी त्यांच्या जिंजर नावाच्या मांजरीने त्यावर छिद्र पाडल्याचा निष्कर्ष या कपल्सने काढला आहे.
Playtonic1 याने Reddit वर असे लिहिले की, काही आठवड्यांपूर्वीच मांजराला दत्तक घेतले होते. मात्र त्यानंतर घरात प्रत्येक सकाळी उठल्यावर ज्या वेळी किचनचा दरवाजा थोडासा उघडलेला दिसायचा तेव्हा घरात भुताटकी सारखे काहीतरी असल्याचे वाटायचे. परंतु मांजरीने ज्या ठिकाणी कंडोम ठेवण्यात येत होते ते बहुधा पाहिले होते. काही तासानंतर या व्यक्तीने पाहिले की,प्लास्टिक स्ट्रॉ, कॉटन फ्लफ, तपकीरी रंगाचे कंडोम चावलेले धक्कादायक दृष्ट दिसले.(Butter Chicken खाण्यासाठी त्याने केला 32 किमी प्रवास; पोलिसांनी ठोठावला भलामोठा दंड, वाचा सविस्तर)
या प्रकारानंतर व्यक्तीने सर्व स्वच्छता केली आणि पुन्हा त्याच ठिकाणी कोणतीही तपासणी न करता बॉक्समध्ये कंडोम ठेवले. ज्यावेळी ते कंडोम वापरण्याची वेळ आली त्यावेळी व्यक्तीने यापूर्वी काय घडले होते याचा विचार केला नाही. परंतु तीन आठवड्यानंतर त्याच्या बायकोला गर्भवतीची लक्षणे दिसून आली. त्यासंदर्भात टेस्ट ही केली असता ती पॉझिटिव्ह आली. असे झाल्यानंतर कंडोम वापरुन सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह आलीच कशी असा प्रश्न सतावू लागला. यासंदर्भात अधिक विचार केला असता या कपल्सला लक्षात आले की त्यांच्या जिंजर नावाच्या मांजरीने जे उपद्व्याप केले होते त्यामुळे हे घडले आहे.(मोठी शिकार केल्यानंतर स्वत: ला थंड करण्यासाठी एका विशाल अजगराने केली 'ही' कृती; Watch Video)
या व्यक्तीने पुढे असे ही लिहिले आहे की, बाथरुम मध्ये ज्या ठिकाणच्या ड्रॉव्हरमध्ये कंडोम्स ठेवण्यात येत होते तेथे सुद्धा तपासून पाहिले. तेव्हा कंडोमच्या पॅकेट्सवर मांजराची कंडोमच्या पॅकेट्सवर नख, दाताने चावलेल्याचे निशाण असल्याचे दिसून आले. या पोस्टवर आता लोकांना विविध प्रतिक्रिया दिल्या असून हे प्रकरण खुप व्हायरल झाले आहे. परंतु आता दुसऱ्या नवजात बालकाच्या स्वागतासाठी हे कपल्स तयार आहेत. परंतु मांजरीमुळे ही गोष्ट घडल्याच्या विचारानेच लोक हसून लोटपोट होत आहेत.