Chain Snatchers Target Woman: सोनसाखळी चोरट्यांनी महिलेला कारसोबत फरफटत नेले, CCTV कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ (Watch Video)
Chain-Snatching CCTV Footage | (Photo Credits: Twitte/ANI)

Chain-Snatching CCTV Footage: कारमधून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांकडून रस्त्याने चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रयत्न झाला. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. ही घटना कईम्बतूर (Coimbatore) येथे घडली. महिलेने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने तीचा थोडक्यात बचाव झाला अन्यथा कारच्या चाकाखाली येऊन महिलेला प्राण गमवावे लागले असते.

वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळलते की, सोनसाखळी चोरटे कशा पद्धतीने आले आणि त्यानी पीडित महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोनसाखळी चोरण्यात चोर यशस्वी झाले किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. पीडित महिलेचे नाव कौशल्या (33) असल्याचे समजते.

पीडित महिनेने म्हटले आहे की, तिला रस्त्यावरून चालताना एक कार पाठिमागून आल्याचे जाणवले. पाठीमागून आलेल्या त्या कारचा वेग कमी झाला. ती कार पांढऱ्या रंगाची होती. कारमध्ये समोरच्या बाजूला पॅसेंजर सीटवर बसलेल्या एका माणसाने हात पुढे अचानक तिच्या गळ्यातील साखळीला हात घातला.

ट्विट

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पीडिता (कौशल्या) घाबली. मात्र, प्रसंगावधान राखत तिने गळ्यातील सोनसाखळी घट्ट पकडली. तिने ती साखळी सोडण्यास नकार दिला. पण या प्रयत्नात ती कारसोबत फरफटत गेली. अखेर कारमधील चोरट्यांनी हार मानली आणि कौशल्या हिला तिथेच सोडून ते पसार झाले. दरम्यान, कोईम्बतूर शहर पोलिसांनी तातडीने तपास करत अभिषेक आणि शक्तीवेल नामक दोन इसमांना अटक केली.