अनेक लोकांना बंजी जंपिंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या साहसी गोष्टी आवडतात. काही वेळा तर लोक आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आपले साहस दाखवण्यासाठी मुद्दाम अशा गोष्टींची जोखीम पत्करतात. मात्र, अनेकवेळा असे धाडस दाखवण्याच्या नादात काही अपघातही घडतात. असाच काहीसा प्रकार राफेल डॉस सॅंटोस टोस्टा (Rafael dos Santos Tosta) नावाच्या व्यक्तीसोबत घडला. आपला घटस्फोट साजरा करण्यासाठी राफेल 'ब्रिज स्विंगिंग’ (Bridge Swinging) करण्यासाठी गेला मात्र त्यावेळी त्याचा मोठा अपघात झाला.
पोर्तुगालचा 22 वर्षीय राफेल घटस्फोट साजरा करण्यासाठी ब्राझीलच्या सहलीवर गेला होता. त्यावेळी राफेलने बंजी जंपिंगसारखाच एक प्रकार 'ब्रिज स्विंगिंग’ करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचे हे सेलिब्रेशन त्याच्यावरच उलटेल याची त्याला कल्पना नव्हती. राफेलने 70 फूट उंचीवरून उडी मारताच, त्याचा दोर तुटला आणि तो खोल दरीत पडला. घटनास्थळी उपस्थित बचाव कर्मचार्यांना एका तो खड्ड्यात सापडला, तिथे तो वेदनेने तळमळत होता.
A man's luck in Brazil took a U-turn when he went 'bridge swinging,' an activity that is similar to bungee jumping, to celebrate his divorce but instead ended up plunging nearly 70 feet and breaking his neck when the rope snapped.
The 22-year-old named Rafael dos Santos Tosta… pic.twitter.com/15h37Rzfrn
— truth. (@thetruthin) May 6, 2023
राफेलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की, राफेलची मान आणि पाठीचा मणका तुटला आहे. त्यानंतर राफेलला बरेच दिवस अतिदक्षता विभागात रहावे लागले. त्याच्या शारीरिक दुखापतींना बरे करण्यासाठी त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. राफेल त्याच्या 22 व्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी त्याचा चुलत भाऊ आणि मित्रासह ब्राझीलमधील कॅम्प मॅग्रो येथील लागोआ अझुल येथे गेला होता. लागोआ अझुल (ब्लू लॅगून) येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी राफेलने हा 'ब्रिज स्विंगिंग’ चा प्रयत्न केला. (हेही वाचा: Husband-Wife Boxing Match: पती-पत्नीमध्ये बॉक्सिंग सामना, पतीने पत्नीला केली बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ)
या घटनेबाबत राफेल म्हणतो, ‘घटस्फोटानंतर मी खूप आनंदी होतो. मला जीवनाचा प्रत्येक प्रकारे आनंद घ्यायचा होता. मला माझ्या आयुष्याची अजिबात किंमत नव्हती मात्र आता या अपघाताने अनेक गोष्टी बदलल्या आहेत.’ आता, जवळजवळ तीन महिन्यांनंतर, अनेक फिजिओथेरपी आणि उपचारांनंतर, राफेल त्याच्या दुखापतीतून सावरू लागला आहे, मात्र अजूनही त्याला चालता येत नाही.