अलिकडेच गोव्यात (Goa) केलेल्या अश्लील फोटोशूट अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली होती. दक्षिण गोव्यातील प्रतिबंधित धरणाच्या ठिकाणी अभिनेत्रीने अश्लील फोटोशूट केले होते. दरम्यान, अश्लील फोटोशूटची परवानगी देणाऱ्या पोलिस निरीक्षकाला आज (गुरुवार, 5 नोव्हेंबर) निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना (Canacona) उपजिल्हा येथील चपोली धरणाजवळ (Chapoli Dam) पूनम पांडे हिचे फोटोशूट पार पडले. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला हे फोटोज व्हायरल व्हायला लागले. त्यावरुन सत्तापक्ष आणि विरोधी पक्षात वादाची ठिणगी उडाली. त्यानंतर फोटोशूटची परवानगी देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावरुद्ध कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. त्याचबरोबर निदर्शकांनी एका दिवसासाठी कॅनाकोना शहर बंद ठेवण्याचा इशाराही दिला होता.
दरम्यान, कॅनाकोना पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी दिली आहे. (Poonam Pandey विरोधात गोवा मधील चपोली डॅम वर अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी GFP Women's Wing कडून FIR दाखल)
पूनम पांडे हिच्या अश्लील फोटोशूट संदर्भात गोवा पोलिसांत सुमारे अर्धा डझन लेखी तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर बुधवारी पोलिसानी एफआयआर दाखल केली. प्रथम ही तक्रार एका अज्ञात व्यक्तीविरूद्ध दाखल करण्यात आली. नंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 294 अंतर्गत पूनम पांडे विरोधात एफआयआर दाखल केली गेली. (Poonam Pandey Topless Photo: पूनम पांडे ने टॉपलेस होउन शेअर केला न्युड फोटो, बघुन व्हाल हैराण)
अलिकडेच पूनम बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे सोबत विवाहबद्ध झाले. हनिमुनसाठी गोव्यात गेलेल्या पूनमने अवघ्या तीन दिवसांत पतीने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर गोवा पोलिसांनी सॅमला अटक केली. परंतु, पूनमने तक्रार मागे घेत सॅमची सुटका केली. यापूर्वी पूनम पांडे हिचे नाव अनेक वादात पुढे आले आहे. बोल्ड फोटोज, हॉट, सेक्सी व्हिडिओज यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अनेकदा विविध वादांमुळेही प्रकाशझोतात येते.