Poonam Pandey (Photo Credits: Instagram)

पूनम पांडे (Poonam Pandey) आणि वाद हे जणू समिकरणच आहे. आता गोव्यामध्ये पूनम पांडेने एक अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी तिच्या विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोव्यामध्ये चपोली डॅम (Chapoli Dam) वर पूनमने केलेल्या शूटिंग प्रकरणी तिच्या विरिद्ध गोवा फॉर्वर्ड पार्टीच्या महिला आघाडीने (women's wing of Goa Forward Party) तक्रार नोंदवली आहे. दरम्यान पुनम सोबतच तिचं शूटिंग करणार्‍या एका अज्ञाताविरूद्धही तक्रार नोंदवण्यात आली आहे. पूनम पांडे तिच्या वेबसाईटवर, सोशल मीडीया हॅन्डल्सवर बोल्ड इमेजेस, सेक्सी फोटो, सेक्सी व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

पूनम पांडे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनामध्ये अडकली आहे. कोरोना वायरस लॉकडाऊन मध्ये पूनम तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे सोबत विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर 3 दिवसांतच तिने पती विरोधात विनयभंग आणि शारिरीक अत्याचाराचे आरोप करत तक्रार नोंदवली होती. नंतर अटकेत असलेला सॅमची सुटका पूनमने तक्रार मागे घेतल्यानंतर करण्यात आली होती.

ANI Tweet

nbsp;

दरम्यान पूनम तिच्या पती सोबत गोव्यामध्ये हनिमूनसाठी गेली आहे. यापूर्वीची पतीविरोधातील तक्रार देखील गोव्यातच दाखल करण्यात आली होती. आता कानाकोना पोलिस स्टेशनमध्ये पूनम विरोधात गोव्यातील राजकीय पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.