Poonam Pandey's Husband Sam Bombay Arrested: पूनम पांडेची नवऱ्या विरुद्ध विनयभंग, मारहाण आणि धमकावल्याची तक्रार; पती सॅम बॉम्बेला गोव्यात अटक
Poonam Pandey (Photo Credits: Instagram)

मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) ही आपल्या मादक अदांनी, सेक्सी व बोल्ड व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती होती की पूनमने तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत लग्न केले. त्यानंतर हे दोघे हनिमूनला जाताना विमानतळावर दिसले होते. आता माहिती मिळत आहे की, पूनम पांडेचा नवरा सॅम बॉम्बे याला मंगळवारी गोव्यात (Goa) अटक करण्यात आली आहे. पूनम पांडेने स्वतः पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यात पूनमने दावा केला आहे की, सॅम बॉम्बेने तिची छेडछाड केली, मारहाण केली आणि तिला धमकावले.

दक्षिण गोव्यातील कॅनाकोना (Canacona) गावात ही घटना घडली असून, पूनम पांडे सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पूनमने सोमवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली की, तिचा नवरा सॅम बॉम्बेने तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला करत, त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली. आता सॅमला अटक करण्यात आली आहे, असे कॅनाकोना पोलिस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले. (हेही वाचा: हॉट मॉडेल पूनम पांडे ने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत केला विवाह; पहा खास फोटो)

एएनआय ट्वीट -

दरम्यान, सॅम बॉम्बे हा पूनम पांडेचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड आहे. पूनमच्या अनेक व्हिडिओमध्ये सॅम दिसून आला आहे. पूनम आणि सॅम यांनी जुलै महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सॅम व पूनमने लग्न केले. लग्नानंतरचे या जोडप्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. नुकतेच पूनम व सॅम विमानतळावर दिसून आले होते, यावेळी पूनम भांगात कुंकू होते व हाहात चुडा होता. पूनमचा हा अवतार तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता.