Burger King: नोकरीच्या 27 वर्षात एकही दिवस नाही घेतली सुट्टी, आता मिळाले तब्बल 1 कोटी रुपये; व्हिडिओ व्हायरल
Burger King | (PC - Social Media)

सोशल मीडियावर (Social Media) एका कर्मचाऱ्याबाबत एक वृत्त चांगलेच व्हायरल झाले आहे. हा कर्मचारी नोकरीला लागल्यापासून म्हणे पाठिमागील 27 वर्षे सुट्टीवरच गेला नाही. हा कर्मचारी बर्गर किंगमध्ये (Burger King) काम करतो. या कर्मचाऱ्याचे डेडिकेशन पाहून लोक चांगलेच प्रभावीत झाल्याचे पाहायला मिळते आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. या कर्मचाऱ्याचे दोन व्हिडिओही (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या कर्मचाऱ्याची अनेकांनी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. हा कर्मचारी अमेरिकेतील लास वेगास (Las Vegas) येथील आहे. हा कर्मचारी एक प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळखला जातो. तो बर्गर किंग (Burger King) कंपनीचा कर्मचारी आहे. त्याने पाठिमागच्या 27 वर्षात एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याची निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून कंपनीने त्याचे कौतुक केले आहे. जेव्हा ही बातमी लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा लोकांनीही कौतुक केले. (हेही वाचा, Funny Job: खूशखबर! आळशी आणि दु:खी लोकांसाठी खास नोकरी, आताच करा अर्ज, पण आगोदर घ्या जाणून)

ट्विट

ट्विट

प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, केविन फोर्ड असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो 54 वर्षांचा आहे.केविन बर्गक किंगमध्ये तो कॅशिअर म्हणून काम करतो. हे वृत्त व्हायरल झाल्यावर जेव्हा लोकांसमोर आले तेव्हा लोकांना वाटले त्याला मिळालेले बक्षिस हे खूपच कमी आहे. त्यातच त्या कर्मचाऱ्याच्या मुलीने एक कॅम्पेन चालवले. त्यानुसार लोकांनी डोनेट करणे सुरु केले. ज्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.