उत्तर प्रदेश (Uttar Pradesh News) राज्यातील रायबरेली (Raebareli) जिल्ह्यातील सलोन येथील एका पोलीस स्टेशनच्या छतावर वळू (Bull Climbs Onto Roof of Police Station) चढल्याने खळबळ उडाली. परिसरात मोकाट हिंडणारा वळू (Bull) अचानक पोलीस स्टेशनच्या छतावर दिसू लागला. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्येही घबराट पसरली होती. विविध कारणांनी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांसह या वळूला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातील काही मंडळींनी या वळूचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. जो आता व्हायरल झाला आहे. दरम्यान, वळू छतावर पोहोचला यापेक्षा तो छतावर चढलाच कसा याचीच अधिक चर्चा परिसरात रंगली होती.
पोलीस स्टेशनमध्ये बघ्यांची गर्दी
अनेकांच्या मदतीला धावणारे आणि अडचणींतून मार्ग काढणारे पोलीसच काही वेळ अडचणीत आले होते. वळू सारखा एखादा मोठा आणि चार पायांचा प्राणी पोलीस स्टेशनच्या छतावर चढला हे पोलिसांसाठीही आश्चर्यच होते. अनेकांच्या पहिल्यांदाच पाहण्यात आलेली ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ज्यामुळे हा प्रकार पाहण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी जमली. परिसरातही या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. (हेही वाचा, Bull Inside Shop in Delhi: बापरे! मोबाईल रिपेअर दुकानात अचानक घुसला बैल; कर्मचाऱ्यांची उडाली घाबरगुंडी (Watch Video))
रुग्णालयात शिरला वळू
अर्थात थोड्याफार फरकाने अशा घटना उत्तर प्रदेश आणि रायबरेलीच्या जनतेसाठी नव्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच रायबरेलीच्या जिल्हा रुग्णालयात एक भटका बैल शिरल्याची घटना पुढे आली होती. धक्कादायक म्हणजे हा बैल रुग्णालयात इतका आत गेला होता की, तो चक्क रुग्णांना तपाल्या जाणाऱ्या खोलीत उभा होता. (हेही वाचा, Viral Video: पिलीभीतमध्ये घराच्या छतावर चढला बैल; अथक परिश्रमानंतर खाली उतरवण्यात यश (Watch) )
उत्तर प्रदेशमध्ये मोकाट प्राण्यांमुळ मृत्यूचे वाढते प्रमाण
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात भटक्या प्राण्यांमुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा समावेश होतो. भटके प्राणी ही जगभरातील शहरांमध्ये वाढणारी समस्या आहे. या प्राण्यांना अन्न आणि निवारा सापडत नाही, त्यामुळे ते रस्त्यावरच राहतात. त्यांना कोणीही मालक नसतो. परिणामी ते रस्त्यावर मोकाट फिरतात. नागरिकांच्या शेतामध्ये जातात. रस्त्यावरील रहदारी आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक धोका निर्माण करतात.
एक्स पोस्ट
Kahein toh Kahein kya, Bole toh Bole kya... Moment for UP Police 🤣 https://t.co/2KWTqHjRmX
— Veena Jain (@DrJain21) July 10, 2024
एका आकडेवारीनुसार, अलिकडील काही काळात प्राण्यांमुळे 1,376 अपघात झाले असून त्यात 804 कुत्रे आणि 350 गुरे यांचा समावेश आहे. रस्ते अपघात आणि दुखापतींसाठी आपण अनेकदा खराब रस्त्यांना दोष दिला जात. परंतु आजकाल रस्ते अपघात आणि जखमी होण्याचे दुसरे सर्वात सामान्य कारण म्हणजे भटके प्राणी. भटक्या प्राण्यांची समस्या नाही; या निष्पाप प्राण्यांना जगण्यासाठी योग्य निवारा आणि अन्न मिळत नसल्याने त्यांना अन्न व निवाऱ्याच्या शोधात रस्त्यावर यावे लागते. भटक्या प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसानही मोठे असते. या प्राण्यांवर उपाययोजनात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी अनेकदा केली जाते. पण, त्यावर फारसा विचार केला जात नाही.