सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक जगभरातील विविध महत्त्वाच्या घटनांचं त्यांच्या कलाकृतीमधून वर्णन करत असतात. त्यांच्या सॅन्ड आर्टचे अनेक नमुने थक्क करणारे आहेत. ओडिशाच्या समुद्र किनारी ते वाळूवर आपली कलाकुसर दाखवतात आणि अनेकांना थक्क करतात. आज बुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे पण कोरोना व्हायरस संकटामुळे अनेकांना तो घरात राहुनच सुरक्षित पणे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज सुदर्शन पटनायक यांनी बुद्ध जयंतीचं औचित्य साधत भगवान गौतम बुद्ध यांचं मोहक सॅन्ड आर्ट थ्रोबॅक फोटोच्या माध्यमातून शेअर केलं आहे. Buddha Purnima 2020: बुद्ध पौर्णिमे दिवशी जाणून घ्या भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज ते ओशो यांचे काय होते विचार.
बुद्ध पौर्णिमेदिवशी पटनायक यांनी निरामय भावमुद्रेतील भगवान गौतम बुद्ध यांचं ध्यानस्थ रूप साकारलं होतं. 'Greetings to all on the auspicious occasion of #BuddhaPurnima . One of my SandArt of lord #Buddha' असा मेसेज लिहित त्यांनी या सॅन्ड आर्टचा फोटो शेअर केला आहे. सुदर्शन पटनायक यांना त्यांच्या कलेसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. Happy Buddha Purnima 2020 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings, GIFs, HD Images च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरा करा यंदा गौतम बुद्धांचा जन्मदिवस!
सुदर्शन पटनायक यांचं ट्वीट
Greetings to all on the auspicious occasion of #BuddhaPurnima . One of my SandArt of lord #Buddha pic.twitter.com/9li2Yy2CWv
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) May 7, 2020
Happy Buddha Purnima Messages: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status, Facebook - Watch Video
भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो.