प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

सेक्स (Sex) ही कोणत्याही जोडप्यामधील फार महत्वाची गोष्ट आहे. नाते टिकण्यासाठी जोडीदारांमधील उत्तम शारीरिक संबंध फार महत्वाचे आहेत. परंतु नात्यामध्ये सेक्सबाबत समाधानी नसल्याची तक्रार अनेक महिला करतात. आजकाल तर डेटिंग अॅप्सवर (Dating Apps) अनेक पर्याय उपलब्ध असूनही, काही महिला सेक्सबाबत खुश नसतात. याच्याशी निगडीत एक प्रकरण समोर आले आहे. तर, डेटिंग अॅप्स ही सोपी प्रक्रिया नसते. यावर प्रोफाइल बनवताना खूप काम करावे लागते. आता एका महिलेची टिंडरवरील प्रोफाइल (Tinder Profile) चर्चेत आहे.

ही महिला एक इन्फ़्लुएन्सर असून, तिने आपल्या टिंडर प्रोफाइलमध्ये तिच्या अपेक्षा नमूद केल्या आहेत. या अपेक्षांमध्ये तिने तिला हव्या असलेल्या पुरुषाच्या लिंगाची साईझ नमूद केली आहे. ओन्लीफॅन्सवर भरपूर कमाई करणाऱ्या मिकाएला टेस्टा (Mikaela Testa) ने अलीकडेच क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदार अॅटिस पॉलपासून विभक्त झाल्यानंतर, टिंडरवर आपली प्रोफाइल उघडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @mikaelatesta

तिथे या 22 वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मॉडेलने अनेक अपेक्षा नमूद केल्या आहेत. मिकाएलाची इच्छा आहे की, तिचा भावी प्रियकर किमान 6 फूट उंच असावा. इतकेच नाही तर त्याच्या लिंगाची (Penis) साईझ कमीत कमी 7 इंच असावी. म्हणजेच सेक्समध्ये समाधानी राहणे, खुश राहणे ही मिकाएलाची प्राथमिक गरज आहे. (हेही वाचा: Worms in Testicles: भारतातील एका व्यक्तीला झाला दुर्मिळ आजार, प्रायव्हेट पार्टमध्ये झाले चक्क किडे)

 

View this post on Instagram

 

A post shared by @mikaelatesta

मेलऑनलाइनच्या वृत्तानुसार, मिकाएलाची डेटिंग प्रोफाइल, Reddit वर लीक झाली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, तिला तिच्यासोबत जगाचा प्रवास करण्यासाठी कोणीतरी हवा आहे. तिने पुढे असेही नमूद केले आहे की, ओन्लीफॅन्सद्वारे तिने भरपूर कमाई केली असून, दोघांच्याही खर्चाचा भार ती उचलू शकते. मिकाएलाने असेही लिहिले आहे की, माझी उंची फक्त 5’3 इंच आहे परंतु मला 6 फुट उंच आणि कमीत कमी 7 इंच लिंगाची लांबी असलेली मुले आवडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by @mikaelatesta

तिने यामध्ये असेही लिहिले आहे की, हा मुलगा बेरोजगार असावा जेणेकरून तो तिच्यासोबत भरपूर प्रवास करू शकेल. या प्रोफाईलबाबत अनेकांनी Reddit वर कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी मिकाएलाच्या अपेक्षा अवास्तव असल्याचे म्हटले आहे तर, काही जणांनी ही एक उत्तम जॉब ऑफर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मिकाएला तिच्या माजी प्रियकरापासून विभक्त झाली होती. ब्रेकअपच्या वेळी, जोडीने चाहत्यांना सांगितले की त्यांनी वेगळे होण्याचा ‘म्युच्युअल’ निर्णय घेतला आहे, परंतु ते मित्र बनून राहतील.