'Mature Bag' Memes मध्ये BMC ची देखील उडी; मुंबईकरांना दिला Civic Maturity चा संदेश
BMC Tweet (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल? याचा नेम नाही. सध्या ‘Mature Bag’ Meme सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. या नव्या ट्रेंडची सुरूवात काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका मुलाच्या व्हिडिओतून झाली आहे. कॉलेजमध्ये आकर्षित दिसण्यासाठी बॅग कशी महत्त्वाची असते हे पटवणारा व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला आणि त्यामधून आता अनेक मिम्स तयार झाले आहेत. सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या मुंबई पोलिस आणि मुंबई महानगर पालिकेच्या सोशल मीडियानेही यामध्ये उडी घेतली आहे. आज (14 जुलै) बीएमसीनेही कचर्‍याचा डब्बा मुंबईकरांसाठी खरी 'Mature Bag'असल्याचं सांगत शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी त्याची गरज अधिक असल्याचं सांगत टोला लगावला आहे.

मुंबई महानगर पालिकेचं ट्विट

कचर्‍याचं वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या डब्ब्याची निवड करण्यातच खरी Civic Maturity असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र पहिल्याच पावसात तुंबई झालेल्या मुंबईमध्ये नागरिकांनी पालिका व्यवस्थेवर आपला राग व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पण मुंबईकरांनीही शहर स्वच्छ ठेवायला मदत करावी असं आवाहन बहुदा आता पालिकेकडून केलं जात आहे. Mumbai Monsoon Helplines: मुंबईकरांसाठी 'बीएमसी'चा MCGM मोबाईल ऍप, टोल फ्री कॉल आणि whatsapp नंबर, पावसाळ्यात समस्या आल्यास या क्रमांकावर मिळणार मदत

मुंबई महानगरपालिकेप्रमाणे मुंबई पोलिसांनी देखील मुंबईकरांना सुरक्षेचा सल्ला दिला आहे.

मुंबई पोलिस ट्विट

सोशल मीडीयावरील धम्माल 'Mature Bag' Memes

सध्या 'Mature Bag' Memes व्हायरल होत आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे 'जेसीबी की खुदाई' चे मीम्स प्रचंड व्हायरल झाले होते.