हातात बंदुक घेऊन भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चैंपियन यांची दारु पार्टी VIDEO VIRAL
BJP MLA Kunwar Pranav Singh Champion | (Photo Credits: Twitter)

BJP MLA Kunwar Pranav Singh Champion Video Viral: वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे भाजपचे आमदार कुंवर प्रणव सिंह चैंपियन (BJP MLA Kunwar Pranav Singh Champion) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रणव सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते दोन्ही हाता बंदुक घेऊन एका दारु पार्टीत डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, कुंवर प्रणव सिंह चैंपियन यांना पक्षातून तीन महिन्यांसाठी निलंबीत केल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचे समजते. या व्हिडिओत आमदार कुंवर प्रणव सिंह चैंपियन स्पष्ट दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत पुष्टी होऊ शकली नाही.

भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चैंपियन हे हातात एक दोन नव्हे तर चक्क तीन रिवॉल्वर आणि एक असॉल्ट रायफल घेऊन गाण्याच्या तालावर डुलताना दिसत आहेत. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, कुंवर प्रणव सिंह चैंपियन हे शस्त्रांसोबत आहेत आणि एकएक शस्त्र हातात घेऊन ते कॅमेऱ्यासमोर दिसत आहेत. दरम्यान, त्यांच्यासोत त्यांचे इतर सहकारीही दिसत आहेत. मात्र, त्यांची ओळख स्पष्ट झाली नाही. (हेही वाचा, नवरदेवाच्या घोड्यावर चढून तरुणाचा जबरदस्त नागिन डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

दरम्यान, कुंवर प्रणव सिंह चैंपियन यांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही जून महिन्यात त्यांचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात ते प्रसारमाध्यमाच्या एका प्रतिनिधीसोबत गैरकृत्य करताना दिसत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पक्षाने त्यांना निलंबीत केले होते.