Pomeranian कुत्रीवर सामूहिक बलात्कार, तीन पुरुषांना अटक; Female Dog च्या अंगावर जखमा, प्रकृती गंभीर
Pomeranian Female Dog | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

चार वर्षे वयाच्या पाळीव कुत्रीवर (Female Dog) सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे घडली आहे. या प्रकरणात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपींनी हाथरस जेलरोड परिसरातून पोमेरेनियन फीमेल डॉगी (Pomeranian Female Dog) चे तिच्या मालकाच्या घराच्या छतावरुन अपहरण केले. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कुत्रीच्या मालकाने बेपत्ता झालेल्या कुत्रीचा शोध घतला असता ती आरोपीच्या खोलीमध्ये बेशुद्ध आवस्थेत सापडली.

कुत्रीच्या मालकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्याच्या घराच्या छतावरुन पाळीव कुत्रीचे अपहरण केले. बराच वेळ कुत्री निदर्शनास आली नाही. त्यामुळे मालकाने आपल्या बेपत्ता कुत्रीचा शोध घेतला. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर कुत्री आरोपी दिनेश कुमार आणि याच्या खोलीत बेशुद्ध आवस्थेत सापडली. या प्रकरणात आलेल्या तक्रारीवरुन आरोपी दिनेश कुमार आणि इतर दोघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 377 (अनैसर्गिक अत्याचार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, क्रुरता निवारण कायदा 11 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पीडित कुत्रीची स्थिती अत्यंत दयनिय आणि चिंताजनक आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने या प्रकरणातील तक्रारदा संतोष देवी याच्या प्रतिक्रियेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिनेश कुमार हा त्यांचा शेजारी आहे. तो संतोष देवी यांच्या घराशेजारी भाड्याने राहतो. संतोष देवी यांनी आरोप केला आहे की, दिनेश कुमार याने गुरुवारी (4 जुलै 2019) रात्री अंडे देऊन कुत्रीला फूस लावली. जवळ बोलावले आणि दोन साथिदारांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केले. तक्रारदाराने म्हटले आहे की, रात्री दहा वाजेपर्यंत आपण आपल्या कुत्रीला पाहिले होते. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. पुढे तक्रारदाराने असेही म्हटले आहे की, सुरुवातीला वाटले की, कुत्री कुठेतरी बसली असेल. पण, बराच वेळ ती घरीच न आल्याने आपण सकाळी 6 वाजलेपासून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी)

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, पीडित कुत्री आरोपीच्या घरात बेशुद्ध आवस्थेत मालकाला आढळून आली. कुत्रीची अवस्था प्रचंड दयनीय आणि चिंताजनक होती. कुत्रीच्या अंतर्गत भागातही जखमा झाल्याचा दावा संतोष देवीने केला आहे. त्यानंतर संतोषने दिनेश कुमार आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची प्राथमिक ओळख ही सतीश आणि अशोक अशी झाली आहे.

पोलिसांना माहिती देताना तक्रारदार संतष देवी याने म्हटले आहे की, तो आपली मुलगी, मुलगा आणि कुत्री (Pomeranian female dog) सोबत राहतो. हाथरस पोलीस स्टेशन अधिकारी परवेश राणा यांनी सांगितले की, कुत्रीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासणीचा अहवाल अद्याप आला नाही. सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही राणा यांनी म्हटले आहे. मात्र,अद्याप तरी कोणा आरोपीला अटक करण्यात आले नाही.