आपल्याला वाटत असेल की योगाभ्यासासाठी समुद्रकिनारा हे परिपूर्ण ठिकाण आहे, परंतु पुढे येणाऱ्या धोक्यांविषयी आपल्यातील कोणालाही माहिती नाही. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात व्यवसायाने योग प्रशिक्षक असलेली एक महिला योगा करत असताना तिचा एका विशाल घोरपडीने चावा घेतला आहे. व्हिडिओमध्ये ती महिला मध्य मुद्रा मध्ये दिसत आहे, ती समुद्रकिनाऱ्यावर स्ट्रेचिंग करत आहे तिची पाठ धनुषाकार आहे आणि डावा हात बाहेर असून लटकलेला आहे. अचानक, एक घोरपड तिच्या दिशेने धावत येते आणि तिच्या बोटाच चावा घेते. ज्यानंतर ती महिला वेदनेने जोरजोरात किंचाळू लागते आणि म्हणते ''ओउ! तिने माझे बोट चावले, ती महिला रागाच्या भरात शिवीगाळ करते आणि वाळू फेकते." मला आज घोरपड चावली आहे, "असे त्या व्हिडिओसह वापरकर्ता @bahamahoopyogi यांनी ट्विट केले आहे. (World's Fastest Rollercoaster: अनेकांच्या शरीरातील हाडे तुटल्यानंतर आता सर्वाधिक वेगवान असलेला रोलरकोस्टर बंद )
व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटिझन्सनी योग प्रशिक्षकाला विचारले जात आहे की, तिने आपले सत्र सुरू करण्यापूर्वी घोरपड पाहिली होती का? ती महिला म्हणाली, 'सगळे विचारत आहेत कि मी तिला पाहिले नाही का,सगळ्या बीचवर घोरपड होत्या. लोक त्यांना नेहमी खाऊ घालण्यासाठी जातात.' एका वेगळ्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, 'चावल्यानंतर लगेचच तिच्या बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला 'आणि एका वेगळ्या एंगल ने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
I get bite from an iguana today🥲 it was bleeding pic.twitter.com/If2DaUztHf
— Da Iguana Gal🦎🇧🇸 (@bahamahoopyogi) August 20, 2021
योग प्रशिक्षकाने पुढे सांगितले की, तिचे बोट आता ठीक आहे. तिने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले आहेत. Pet Enthusiast website च्यानुसार, घोरपडीना अपवादात्मकपणे तीक्ष्ण दात असतात, म्हणून त्यांचा चावा धोकादायक असू शकतो आणि चाव्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. या व्हिडिओला 3.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून, व्हिडिओ 27,000 पेक्षा जास्त शेअर झाला आहे. काहींनी योगा प्रशिक्षकाबद्दल मनापासून काळजी व्यक्त केली आहे. तर इतरांनी लिहिले की कदाचित घोरपड उपाशी होती आणि तिने बोटाला अन्न समजले.