जेव्हा कोणी प्रेमात पडते तेव्हा त्याला रंग -रूप , जात, देश, धर्म असे काहीही दिसत नाही. पण बेल्जियममधून एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक तरुणी चक्क चिंपांझीच्या प्रेमात पडली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर लोकांना ही आश्चर्य वाटत आहे की एखादी व्यक्ती एखाद्या प्राण्याच्या प्रेमात कशी पडू शकते? WION मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अॅडी टिमरमॅन्सच्या ((Adie Timmermans) प्रेमात पडलेल्या चिंपांझीला बेल्जियममधील अँटवर्प (Antwerp Zoo) प्राणीसंग्रहालयात कैद केले आहे. (Viral Video: लोकवस्तीत वाघाने फोडली डरकाळी, सुंदरबन येथील हैराण करणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद )
मुलगी दर आठवड्याला त्या चिंपांझीला भेट देते. चिंपांझीचे नाव चिता (Chita) आहे आणि चिंपांझीचे वय 38 वर्षे आहे. त्या मुलीने सांगितले की, 'ती चिंपांझीवर खूप प्रेम करते. ती दर आठवड्याला चिंपांझींना भेट देते. ते दोघे काचेच्या दोन्ही बाजूंनी एकमेकांना भेटतात आणि फ्लाइंग किस करतात. तिने चिंपांझीला तिचा जीवनसाथी मानले आहे'. मात्र अँटवर्प प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन मुलीचे आणि चिंपांझीचे प्रेमाचा स्वीकार करत नाही आहे. त्यांनी मुलीवर प्राणिसंग्रहालया येण्याची बंदी घातली आहे. आता तिला यापुढे प्राणीसंग्रहालयात प्रवेश मिळणार नाही. (Crab Cutting Vegetables: 'हा' व्यक्ती चक्क खेकड्याकडून कापून घेतो भाजी; पहा Viral Video )
ते म्हणाले की, 'चिंपांझीचे स्त्रीवरील प्रेम हानिकारक ठरू शकते. स्त्रीच्या प्रेमामुळे, इतर चिंपांझी त्याच्यापासून स्वतःला दूर करू लागले आहेत. जेव्हा ती स्त्री तिथे नसते, तेव्हा तो एकटाच दुःखी होतो.' मुलगी म्हणते की, 'प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने माझ्यावर अन्याय केला आहे. इतर प्राणीसंग्रहालयातील पाहुण्यांना चिंपांझींसोबत वेळ घालवण्याची परवानगी असताना मला का अडवले जात आहे? मी त्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे.'