Crab Cutting Vegetables: 'हा' व्यक्ती चक्क खेकड्याकडून कापून घेतो भाजी; पहा Viral Video
Crab Cutting Vegetables Photo Credits: instagram)

सोशल मीडियावर आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओज (Videos) पाहायला मिळतात. त्यातील अनेक व्हिडिओज व्हायरल होतात. आता असाच एक व्हायरल झालेला पण अजब व्हिडिओ समोर येत आहे. तो पाहुन तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. भारतीय लोक प्रयोगशील असून त्यांचे देसी जुगाड प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क खेकड्याकडून भाजी कापून घेत आहे. यापूर्वी पाळीव प्राणी घरातील कामात मदत करत असल्याचे व्हिडिओज पाहिले आहे. परंतु, खेकड्याकडून भाजी कापून घेणे हा अजब प्रकार आता समोर येत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील be_idiotic नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्याला 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लाईफ हॅक असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एका व्यक्तीने खेकडा हातात धरला  आहे. आणि दुसऱ्या हातात भेंडी आहे. ती व्यक्ती भेंडी खेकड्याच्या नांग्यात देत आहे. आणि नांगीने खेकडा भेंडी कापत आहे. व्हिडिओच्या बँकग्राऊंडला मेरा देश बदल रहा है या गाण्याचे म्युझिक ऐकू येत आहे. (Dog Viral Video: चक्क कुत्रा करतोय सिक्युरीटी गार्डची ड्युटी; गेट उघडण्यापासून ते रजिस्टरमध्ये एन्ट्री करण्यापर्यंत चोख करतोय काम, पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by BE IDIOTIC ❤️ (@be_idiotic)

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून यावर विविध प्रतिक्रीया येत आहेत. किचनमध्ये चाकू ऐवजी खेकड्याची गरज असल्याचे युजर्स कमेंटद्वारे म्हणत आहेत. अशा प्रकारचा हा पहिला व्हिडिओ नसून यापूर्वी माकड कपडे धुवत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान,  प्राण्यांचे शोषण होत असल्याचे म्हणत अशाप्रकारच्या व्हिडिओजवर काही प्रमाणात टीकाही केली जाते.