Viral Video: व्यक्तीला भले धरतीवरील समजूतदार प्राणी म्हणून ओळखले जात असले तरीही जनावर ही त्याचपद्धतीने वागताना काही वेळा दिसून येतात. एखाद्यावेळेस जर भुकंप येण्याची स्थिती निर्माण होते तेव्हा प्रथम त्याची चाहुल जनावरांना लागते. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भुकंप येण्यापूर्वी मांजरीला त्याचा आभास झाला. त्याचवेळी तिने आपल्या मालकाला कशा पद्धतीने अलर्ट केले त्याच्याच व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ Brodie Lancster नावाच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर करण्यात आला आहे. त्यासाठी कॅप्शन असे लिहिण्यात आले की, मजेची गोष्ट नाही... भुकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली असता मी कॅरलला तिच्या फिश टॉ सोबत खेळत असताना शूट केले. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला आतापर्यंत 2.5K लोकांनी पाहिले आहे. तसेच 12 लोकांनी रिट्विट आणि 99 लोकांनी लाइक केला आहे. तसेच विविध प्रतिक्रिया सुद्धा या व्हिडिओवर युजर्सकडून दिल्या गेल्या आहेत.(Kolkata Rains: रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मिळाले 15 किलोचे Catla Fish, पहा व्हिडिओ)
Tweet:Lucky my cat is smarter than me cos this happened a second later. pic.twitter.com/AR3UTyepy4
— Brodie Lancaster (@brodielancaster) September 21, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडिओ असे दिसून येते की, कॅरल नावाची एक सफेद रंगाची मांजर ही हलणाऱ्या एका फिश टॉय सोबत खेळत आहे. खेळता-खेळता अचानक मांजरीला भुकंप होणार असल्याचा भास होते. त्याचवेळी ती तिथून पळून जाते. मांजराच्या मालकाच्यानुसार, तिला भुकंपाचा भास झाल्यानंतर त्याचे धक्के जाणवले होते.