Asha Bhosle (Photo Credits: Facebook)

आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या सुमधूर आवाजाचे जगभरात चाहते आहेत. पण त्यांच्या गायकी अंदाजाप्रमाणे त्यांना नृत्यही पाहण्यासारखं आहे. डांसर आशा भोसले यांची बाजू फारशी लोकांसमोर आलेली नाही पण सध्या सोशल मीडियात वायरल होत असलेल्या त्यांच्या जुन्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या आशा भोसले 88 वर्षांच्या आहेत पण त्याचं गाणं आजही त्यांनी विविध माध्यमातून जपून ठेवलं आहे. 'त्या' गाण्याविषयी आशा भोसले यांनी खोचक ट्विट करत विचारला प्रश्न; चाहत्यांनी दिली भन्नाट उत्तरे

सोशल मीडीयामध्ये सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओत आशा भोसले बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. असं वाटू शकतं पण डांस मराठमोळ्या आम्ही ठाकरं ठाकरं गाण्यावरील आहे. यामध्ये खास बाब म्हणजे आशाताई ऋतिकच्याच  गाण्यामधील सिग्नेचर स्टेप मध्ये थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका जुन्या कॉन्सर्ट मधील आहे. यावेळी आशा भोसले स्टेजवर चक्क थिरकताना दिसत आहेत.

आशाताईंचा डांस

आशा भोसलेंच्या डांस अंदाजावर त्यांच्या चाहत्यांसोबत कलाविश्वातून देखील कौतुकाचा, त्यांच्या स्पिरीटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या या 'रॉकस्टार' अंदाजावर आनंद व्यक्त केला आहे. आशा भोसले यांनी मंगेशकर घराण्यात आपल्या बहिण-भावंडांप्रमाणेच गाणं हेच करियर म्हणून निवडलं. पण त्यांनी विविध भाषा आणि विविध अंदाजात आपला आवाज रसिकांसमोर आणला. भजन, भावगीत, लावणी, सिनेगीत पासून अगदी वेस्टर्न अंदाजामध्ये गाणं सादर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार दिला आहे.