'त्या' गाण्याविषयी आशा भोसले यांनी खोचक ट्विट करत विचारला प्रश्न; चाहत्यांनी दिली भन्नाट उत्तरे
Asha Bhosale (Photo Credit: Twitter)

देशात उजवे सरकार आले आणि जातीविषयक चालणाऱ्या राजकारणात तेल ओतले गेले. आतातर रस्त्यात कोणालाही थांबवून ‘जय श्री राम’ म्हणण्याची सक्ती केली जात आहे. याच गोष्टीला नकार दिल्याने अनेकांचा मृत्य झाल्याच्या घटना समोर आली आहेत. यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. अशा मॉब लिंचिंगच्या (Mob Lynching) घटनेविरोधात देशातील अनेक लोक एकवटले आहेत. याच मुद्द्यावर लोकप्रिय गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सर्वत्र चालू आहे. आपण ‘हरे कृष्ण हरे राम’ हे गाणे सादर करू का? असा प्रश्न अशा भोसले यांनी विचारला आहे.

आशा भोसले आपल्या ट्विट म्हणजे म्हणतात, ‘दम मारो दम... बोलो सुबह श्याम हरे कृष्णा हरे राम... मी हे सदाबहार गाणे सदर करू का?’. या ट्विटमधील आशा भोसले यांच्या खोचक वृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर अनेकांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत नक्की काय करावे याचा सल्ला दिला आहे. यामध्ये ‘द स्किन डॉक्टर’ (THE SKIN DOCTOR) या युजर्स ने दिलेली प्रतिक्रिया अतिशय भन्नाट आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘कायदेशीररित्या आपण हे गाणे गाऊ शकता, आपणास कोणी थांबवू शकत नाही. मात्र आपण सामाजिक परिस्थितीचे भान ठेवायला हवे. त्यामुळे आपण ‘हरे अल्लाह, हरे राम’ असे गाणे गायलेत तर ते जास्त उचित ठरेल, बाकी तुमची मर्जी.’ (हेही वाचा: दिग्दर्शक अनुराग कश्यप याला सोशल मीडियात जीवे मारण्याची धमकी)

दरम्यान, मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर देशातील 49 जणांनी पीएम नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना एक पत्र लिहून अशा गोष्टी नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या 49 जणांमध्ये फिल्म मेकर अनुराग कश्यप, मणिरत्नम, रामचंद्र गुहा असे लोक सामील आहेत. या पत्राचे उत्तर म्हणून कंगना रनौत सह 61 लोकप्रिय लोकांनी ओपन लेटर लिहिले आहे. यात ते म्हणतात मॉब लिंचिंगसारख्या मुद्द्यावर बोलणारे लोक इतर मुद्द्यावर का काही बोलत नाहीत? यामध्ये प्रसून जोशी, वादक पंडित विश्व मोहन भट्ट, चित्रपट निर्माते मधुर भंडारकर, विवेक अग्निहोत्री असे लोक समाविष्ट आहेत.