Navneet Kaur: खासदार नवनीत कौर यांनी चक्क चुलीवर थापल्या गोल-गोल भाकऱ्या, पाहा व्हिडिओ
Navneet Kaur (Photo Credit: Twitter)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Kaur) या सातत्याने चर्चेत असतात. नवनीत राणा यांना आपण आंदोलनात घोषणाबाजी करताना किंवा संसदेतून महाराष्ट्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवताना पाहिले आहे. सध्यस्थितीत पूरग्रस्त भागाचा दौरा करतानाही नवनीत राणा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, आता नवनीत राणा एका वेगळ्या आणि खास भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नवनीत कौर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत त्या चक्क चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहेत.

नवनीत कौर या शनिवार आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील अंजनगाव वारी येथील आपल्या शेतातील घरात मुक्कामी होत्या. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या हाताने भाकऱ्या थापून आपल्या कुटुंबाला खाऊ घातल्या आहेत. त्यावेळी भाकरी थापत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे देखील वाचा-Fact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

व्हिडिओ-

सध्या देशातील इंधनाचे दर आणि घरगुती गॅसच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध करत आहे. याचपार्श्वभूमीवर खासदार नवनीत कौर यांचा चुलीवर स्वयंपाक करतानाचा व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.