अहमदाबाद: कोळीच्या नव्या प्रजातीचा शोध लागल्याने संधोशकाने दिले 'सचिन तेंडूलकर' याचे नाव
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

गुजरात (Gujarat) मधील पर्यावरणशास्र आणि संधोशन संस्थेतील एका कनिष्ठ संशोधकाने दोन कोळी प्रजातींचा शोध लावला आहे. त्यानुसार इंडोमॅरेंगो आणि मॅरेंगो अशी दोन कोळी प्रजातींची नावे आहेत. मात्र यामधील एका कोळी प्रजातीला क्रिकेट विश्वातला देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचे (Sachin Tendulkar) नाव संशोधकाने आहे. ध्रुव प्रजापती असे संशोधकांचे नाव असून त्याने कोळी वर्गीकरण प्रजातीवर पीएचडी करत आहे.

ध्रुव प्रजापती यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष एका रशियन जर्नल अथ्रोपोडा सिलेक्टा मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. कोळीच्या दोन प्रजातीमधील मॅरेंगो या प्रजातीला सचिन तेंडुलकर असे नाव दिले आहे. ही शोध लावलेली प्रजाती आशियामधीलच आहे. तर दुसऱ्या प्रजातीच्या कोळी इंडोमॅरेंगा याला छावारापटेरा असे नाव दिले आहे.(Viral Video: पहा समुद्रात 'व्हेल' मासा चक्क तरुणासोबत खेळतोय ‘कॅच-कॅच’!)

प्रजापती यांनी आपण ज्यामुळे प्रेरित होतो त्यांची नावे कोळीच्या प्रजातींना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सचिन याचे नाव देण्यामागे मुख्य कारण म्हणजे प्रजाती यांच्या आवडीचा क्रिकेटपटू असल्याने ते नाव ठेवण्यात आले आहे. तर दुसरे नाव हे संत कुरैकोर एलिया छावरा यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवण्यात आले आहे. कोळी प्रजातींचा समावेश जागतिक कोळी यादीमध्ये सहभागी करण्यात आले आहे. तर जगभरात एकूण 48 हजार कोळी प्रजाती असल्याचे प्रजापती यांनी सांगितले आहे.