Snake Bite Viral Video: भगवान शिव असल्याचे भासवून तरुणाचा नशेत सापासोबत खेळ; सर्पदंशामुळे तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Youth dies due to snakebite (PC - Twitter)

Snake Bite Viral Video: उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये दारूच्या नशेत असताना गळ्यात साप (Snake) घेऊन खेळणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. सर्पदंशाने (Snake Bite) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गळ्यात साप गुंडाळून ती व्यक्ती स्वत:ला भोलेनाथचा बाप म्हणवून सापाला पुन्हा पुन्हा चावण्याचे आव्हान देत होती. यानंतर सापाने त्याला चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती 'मी भोलेनाथचा बाप आहे' असे म्हणत आहे. त्यानंतर तो सापाशी खेळतो. कधी तो साप गळ्यात गुंडाळायचा तर कधी हातावर आणि जिभेवर चावायचा प्रयत्न करायचा. नंतर सर्पदंशामुळे तरुणाचा मृत्यू झाला. रोहित जैस्वाल असे मृत तरुणाचे नाव आहे. (हेही वाचा -Snake Venom: सर्पदंशामधून विषाने नशा केली जाऊ शकते का? जाणून घ्या या Drug Addiction ची लक्षणं, साईड इफेक्ट्स)

दरम्यान, ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. मद्यधुंद अवस्थेत हा युवक हातात धरून सापाशी खेळत होता आणि स्वत:ला भोलेनाथ बाप म्हणत सापाला शिवीगाळ करत होता. व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो हाताने सापाला मारत आहे. यादरम्यान तो सिगारेटही ओढत आहे. अखेर या खेळादरम्यान सापाने तरुणाला चावा घेतला. या दुर्दैवी घटनेत सापाचा मृत्यू झाला.

खुखुंडू पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, युवकाचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुण स्वत: मरेपर्यंत त्याचा व्हिडिओ बनवत राहिला. 4 मिनिटे 38 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या सापाच्या चाव्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला तो साप क्रेट प्रजातीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, 22 वर्षीय मृत रोहित जैस्वाल खुखुंडू पोलीस स्टेशन हद्दीतील अहिरौली गावात त्याच्या मेहुण्यासोबत राहत होता. सहा भाऊ आणि बहिणींमध्ये तो सर्वात लहान होता. त्याचे आई-वडील सिलीगुडी येथे राहतात.