Dog Rescue From Waterfall Video: जीवाची पर्वा न करताना तरुणाने वाचवले कुत्र्याला, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल
rescue of a dog from a water fall. PC INSTA

Dog Rescue From Waterfall Video: सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी धरण ओव्हर फ्लो होत असताना दिसत आहे. काल रायगडावर अनेक पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली होती. बचाव कार्याच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ओव्हर फ्लो झालेल्या एका धरणात कुत्रा अडकला आहे. या कुत्र्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी तरुणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धरणात जाण्याचे धाडस केले आणि कुत्र्याला सुखरुप बाहेर काढले आहे. (हेही वाचा- नागपूर मध्ये भरधाव वेगात असलेल्या बसने दिली सायकलस्वाराला धडक; CCTV मध्ये घटना कैद ( Watch Video)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कुत्रा ओव्हर फ्लो झालेल्या धरणाच्या मधोमध अडकला आहे. त्याला वाचवण्यासाठी तरुणाने शक्कल लढवत दोरीच्या सहाय्याने कुत्र्याच्या मदतीसाठी धाव घेतला आहे. पाण्याचा प्रवाह इतका भीषण आहे की, कुणीही सहज पाण्याच्या प्रवाहात सोबत निघून जाईल. परंतु तरुणाने धाडसी वृत्ती दाखवत कुत्र्याचा बचाव केला आहे.

पाहा धरणात अडकलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ  

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudhir Kudalkar (@sudhirkudalkar)

हा व्हिडिओ पोलिस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. धडकी भरवणाऱ्या या व्हिडिओवर आता पर्यत लाखो व्हूज आले आहे. अनेक प्राणी प्रेमींनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.