Fact Check: CBSE बोर्डाच्या इयत्ता 10 आणि 12 वी परिक्षेचे व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणारे वेळापत्रक खरे की खोटे? PIB ने सांगितली मेसेज मागील सत्यता
CBSE Class 12 Time Table Going Viral on Social Media Is Fake (Photo Credits: Twitter/@PIBFactCheck)

देशभरात कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे CBSE बोर्डच्या 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा रखडल्या होत्या. त्यातच सोशल मीडियावरील फॉरवर्ड होणारे मेसेजेस पालक आणि विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर घालत होते. दरम्यान CBSE बोर्डच्या 10 वी आणि 12 वी परिक्षांचे वेळापत्रक (Date Sheet) व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जात होते. व्हायरल होणारे हे वेळापत्रक फेक असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) सांगितले आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता CBSE बोर्डच्या 10 वी आणि 12 वी च्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजला बळी पडू नका, असे PIB कडून सांगण्यात येत आहे.

सीबीएसई बोर्डाच्या 10 वी, 12 वीच्या परिक्षांचे वेळापत्रक अशा दावा करणारे एक वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ते फेक असून आज संध्याकाळी 5 वाजता अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे PIB Fact Check कडून सांगण्यात आले आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधित कोणतीही शंका असल्यास cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  (CBSE Board Exams 2020: सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 10 आणि 12 वी च्या वर्गासाठी आज संध्याकाळी 5 वाजता Datesheet जाहीर होणार)

PIB Fact Check Tweet:

लॉकडाऊनमुळे सीबीएसई बोर्डाच्या रखडलेल्या परिक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असणारा संभ्रम आज अखेर दूर करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या काळात अनेक फेक न्यूज डोके वर काढत आहेत. परंतु, सत्यता तपासल्याशिवाय सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही मेसेजला बळी पडू नका. विशेष म्हणजे अफवांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप लवकरच एक फिचर लॉन्च करणार आहे. त्यामुळे फेक मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी वार्निंग देण्यात येणार असून यामुळे फेक न्यूजला चाप बसण्यास नक्कीच मदत होईल.