Snake in AC: एमिटी युनिव्हर्सिटी नेहमीच काहीना काही कारणांवरुन चर्चेत राहत असते. नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीचा एक व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. युनिव्हर्सिटीच्या एका वर्गात साप आढळल्याची घटना समोर आली आहे. साप एअर कंडिशनिंग व्हेंटमधून बाहेर येत आहे. (हेही वाचा- देहराडून येथे डीएमने दारूच्या दुकानात 20 रुपये जादा आकारल्याबद्दल दंड ठोठावला, व्हिडिओ व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीच्या एका वर्गात साप आढळला.अचानक एसीच्या कंडिशनिंग व्हेंटमधून साप बाहेर आला. एकाने ही घटना फोनमध्ये कैद केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साप आढळल्याने विद्यार्थ्यामध्ये आणि शिक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली. ही घटना वर्गात शिक्षक शिकवत असताना घडली.
पाहा व्हिडिओ
नोएडा में एमिटी यूनिवर्सिटी की चलती क्लास में निकला सांप, क्लास में मची भगदड़, AC के वेंटीलेशन से अचानक निकला सांप, छात्र-छात्राओं ने सांप निकलने का बनाया वीडियो।#gautambuddhnagar #Amityuniversity #Noida pic.twitter.com/EqBZdNIRJt
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) September 20, 2024
विद्यार्थ्यांनी वर्ग रिकामी केला. त्यानंतर सापाला सुरक्षितपणे पकडण्यासाठी सर्पमित्राला पाचारण करण्यात आले, सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, परंतु या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. १६ सेंकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एमटी युनिव्हर्सिटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.