काय सांगता! 82 वर्षांच्या किरण बाई उचलतात डम्बल आणि मारतात स्केट्स, पाहा तरुणांनाही लाजवतील असे या आजींचे Workout व्हिडिओज
Kiran Bai (Photo Credits: Instagram)

मनामध्ये करण्याची आवड, जिद्द आणि चिकाटी असेल तर आयुष्यात कोणतीही साहसी गोष्ट करायला वयाची मर्यादा आड येत नाही. या वाक्याचा खरा अर्थ कोणाला असेल तर त्या आहेत चेन्नईतील 82 वर्षांच्या किरण बाई (Kiran Tai)...या आजींनीही आपल्यातील आवड, दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर या आजीबाईंना तरुणांनाही लाजवेल असा वर्कआऊट केला आहे. या आजी वयाच्या 82 व्या वर्षी डम्बल्स उचलतात, स्केट्स मारतात. त्यांचे व्हिडिओज सध्या सोशल मिडियावर (Viral Videos) धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओजवर कमेंट्सचा वर्षाव होत असून अनेकांनी हे व्हिडिओज पाहिले आहेत.

आजच्या तरुण पिढीला पराभव पचविण्याची ताकद नाहीय ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवून आयुष्यात आलेले अपयश पचवून परत नव्याने सुरुवात करण्यापेक्षा ते डिप्रेशनमध्ये जातात प्रसंगी आत्महत्येचे पाऊल उचलताना दिसतात. तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे अलीकडच्या पिढीचे राहणीमान, त्यांचे खान-पानही बदलत चालले आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. याउलट या 82 वर्षांच्या आजीबाई आपला छंद जोपासत वयाच्या 82 वर्षी वर्कआऊट करताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Ghaziabad Viral Video: गाझियाबादमधील महिलेने आपल्या खांद्यावर मुलीला बसवून चालवली बुलेट; धोकादायक स्टंट पाहून तुम्हीही व्हाल हैराण

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Bai (@granny.trains)

आजकाल तर लोक वयाची 35-40 शी ओलांडल्यानंतर आपले वय झाले. आता आपल्याला काही करता नाही. असे सांगत श्रमाची काम टाळतात. मात्र त्यामुळे त्याचे शरीर सुस्त बनते आणि म्हातारपणात त्यांना याचा खूप त्रास होतो. मात्र किरण बाईंनी मात्र ज्या वयात लोक जगण्याची इच्छा सोडून देतात त्या वयात लोकांना नव्याने जगायला शिकवणारा अनमोल संदेश त्यांनी आपल्या व्हिडिओजमधून दिला आहे. त्यांनी सुरुवातीला 0.5 किलोचे वजन उचलले. ते हळूहळू करत 10,`15 आणि आता 20 किलोचे वजन उचलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Bai (@granny.trains)

वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे हे सर्व वर्कआऊट चापूनचुपून गुजराती साडी नेसून केलेले आहेत. त्यामुळे त्यांचे असंख्य लोक फॅन्स झाले आहेत. एवढे वय असताना देखील त्या हे सर्व कसं काय करतात याचच सर्वांना आश्चर्य वाटत आहे.