Zombie Drug Epidemic: काय आहे 'झोम्बी ड्रग्ज'? Xylazine चा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम?
Zombie Drug | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

कोविड-19 म्हणजे कोरोनाव्हायरस नावाच्या भयावह महामारीतून बाहेर पडलेले जग अद्यापही सावरते आहे. तोवरच आता 'झोम्बी ड्रग' (Zombie Drug) नावाची महामारी डोके वर काढते की काय अशी चर्चा आहे. युनायटेड स्टेट्स येथील फिलाडेल्फीया (Philadelphia) येथे या महामारीने सध्या डोकेदुखी वाढवली आहे. झोम्बी ड्रग महामारीला Xylazine, 'Tranq' किंवा 'Tranq Dope' असेही म्हटले जाते. या महामारीतही निद्रानाश अथवा श्वसनाशी संबंधीत विकार जडतात, अशी प्राथमिक माहिती आहे. झोंबी ड्रग्जमुळे नागरिकांची होणारी अवस्था दाखवणारे अनेक व्हिडिो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Xylazine, ज्याला सहसा "झोम्बी ड्रग" किंवा "ट्रॅन्क्विलायझर" म्हणून संबोधले जाते. हे एक पशुवैद्यकीय औषध आहे. जे प्रामुख्याने स्नायू शिथिल करणारे आणि प्राण्यांसाठी वेदनाशामक (वेदना निवारक) म्हणून वापरले जाते. हे अल्फा-2 अॅड्रेनर्जिक ऍगोनिस्ट नावाच्या औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे.

Xylazine चे मानवांवर होणारे परिणाम त्याच्या पशुवैद्यकीय वापरापेक्षा वेगळे आहेत. काहीवेळा त्याचा इतर कारणांसाठी गैरवापर केला जातो किंवा ते बेकायदेशीरपणे वापरला जातो. प्रामुख्याने इतर पदार्थांमध्ये जसे की ओपिओइड्स, बेंझोडायझेपाइन किंवा सिंथेटिक कॅनाबिनॉइड्स सोबत हे मिसळले जाते. त्यातून एक वेगळाच पदार्थ तयार केला जातो.. या औषधांसोबत xylazine चे मिश्रण एक शक्तिशाली आणि धोकादायक परिणाम निर्माण करू शकते. ज्यामुळे त्याच्या शामक आणि स्थिर गुणधर्मांमुळे "झोम्बी ड्रग" हा शब्द तयार होतो. या मित्रणालाच झोम्बी ड्रग्ज असेही म्हणतात. (हेही वाचा, Zombie Virus Cases: झोंबी व्हायरस खरोखरच पसरला? फिलाडेल्फियाच्या रस्त्यावर लोकांचे विचित्र वर्तन, व्हिडिओ पाहून नेटीझन्स हैराण)

व्हिडिओ

Xylazine सोबत इतर औषधांचे मिश्रणतयार केले जाते (जे बेकायदेशीर आहे) आणि त्याचे मानवाकडून सेवन होते तेव्हा झोंबी सदृश्य स्थिती तयार होते. सेवन केलेल्या व्यक्तीचा परस्परांशी संमन्वय कमी होतो. तो धुंदीत राहतो. ज्याला ट्रान्समध्ये राहणेही म्हणतात. त्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडणे, तंद्री लागणे, सुस्थपणा, निद्रानाश आणि संभ्रमीतपणा वाढू शकतो.

व्हिडिओ

Xylazine चा नशा अथवा इतर कारणांसाठी वापर (विशेषत: इतर पदार्थांच्या सोबत) आरोग्यासाठी जोखीम तयार करते. त्याचे अतिसेवन केल्यास श्वसनक्रिया बंद होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की xylazine चा बेकायदेशीर वापर त्यंत धोकादायक आहे. कारण मानवांवर त्याचे परिणाम भयंकर होतात. बेकायदेशीर औषधांचा वापर टाळून वैयक्तिक आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणे आणि मादक द्रव्यांचा गैरवापर किंवा व्यसनाधीनता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.