युगेंद्र पवार यांना Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांकडून घेराव; व्हिडिओ व्हायरल
Yugendra Pawar |

Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) या वेळी वेगळ्याच दृष्टीने राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने या मतदारसंघात प्रथमच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या रुपात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांचे कार्यककर्ते आमनेसामने येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच एक घटना सोनेश्वर परिसरात घडली. शरद पवार यांचे समर्थक युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचा प्रकार पाहायला मिळाला. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युगेंद्र पवार हे आज (20 मार्च) बारामती मतदारसंघातील सोनेश्वर परिसरात आले होते. तेथे त्यांनी पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. उल्लेखनीय असे की, पवार कुटुंबीय हे शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत. तर अजित पवार यांची भूमिका कुटुंबीयांना फारशी आवडली नसल्याने ते एकटे पडले आहेत. उल्लेखनिय म्हणजे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पाटील हे देखील त्यांच्या सोबत न जाता शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते अजित पवार यांच्यावर टीका करतानाही दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात नाराजी आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी युगेद्र पवार यांच्याकडे व्यक्त केली.

अजित पवार गटातील कार्यकर्त्यांचे म्हणने युगेंद्र पवार शांतपणे ऐकूण घेताना दिसत आहे. तसेच, सोशल मीडियावर येणारे अनेक व्हिडिओ एडीट केलेले असतात. त्यामुळे अशा व्हिडिओवर व्यक्त होण्यापूर्वी त्याच्या अधिकृततेची खात्री करुन घ्यावी, असेही ते सांगताना व्हिडिओत दिसत आहेत. दरम्यान, शरद पवार गटातील काही कार्यकर्त्यांकडून चुका झाल्या तर त्या दुरुस्त करु असेही आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले आणि त्यानंतर युगेंद्र पवार पुढच्या नियोजीत कार्यक्रमासाठी निघून गेले.

व्हिडिओ

दरम्यान, युगेंद्र पवार यांना दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या घेरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर राजकीय संघर्ष तळागाळात पोहोचला आहे. हा संघर्ष आता पवार कुटुंबीयांपर्यंतही पोहोतचो आहे असे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे, अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे संघर्ष कोणते टोक गाठतात याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, प्रमुख राजकीय नेते मात्र कार्यकर्त्यांना सबूरीचा सल्ला द्यायला विसरत नाहीत.