राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या (Rape) घटना घडत आहेत. सांताक्रूझमध्ये (Santacruz) तरुणीवर सामूहिक बलात्कार (gang Rape) करून त्यानंतर तिची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे लाजिरवाणे कृत्य करणारे आरोपी पीडितेचे जवळचे मित्र आहेत. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधकांना अटक केली आहे.
पीडित तरुणी सांताक्रूझमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. या तरुणीच्या घराशेजारी चाळीतील एका खोलीत 3 तरुण राहत होते. यातील दोघेजण गुरुवारी संध्याकाळी दारू पिण्यास बसले होते. याच दरम्यान पीडित तरुणी त्यांच्या खोलीपासून जात असताना या दोघांनी तिला आवाज दिला आणि घरात बोलावलं. पीडित या दोघांना ओळखत असल्याने ती त्यांच्या खोलीत गेली. दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तिच्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला बेदम मारहाण करत उशीने तोंड दाबून हत्या केली आणि तेथून पळ काढला. (हेही वाचा - सांगली: कवठे महांकाळ पंचायत समिती माजी सभापती मनोहर पाटील यांची हत्या, एका आठवड्यात राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांचा खून)
Mumbai Police: Two people arrested for allegedly raping & murdering a woman in Santacruz area of the city. Case registered under relevant sections, further investigation underway. pic.twitter.com/uTJBXF5B4a
— ANI (@ANI) February 7, 2020
दरम्यान, या खोलीत राहणारा तिसरा तरुण आल्यानंतर त्याने तरुणीचा मृतदेह पाहिला. त्याने यासंदर्भात शेजारी तसेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात पीडित तरुणीवर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं आहे. वाकोला पोलिसांनी या दोन नराधमांना ठाणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं आहे.