प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

मुंबईतील प्राणिसंग्रहालयामध्ये बरेच आमूलाग्र बदल होत असताना तेथे वन्य जीवांच्या मृत्यूच्या घटनाही आपल्याला ऐकायला मिळतात. अशी एक घटना घडलीय मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील(Sanjay Gandhi National Park) 'यश' वाघाचा कर्करोगाने मृत्यू झालाय. त्याच्या जाण्याने ह्या राष्ट्रीय उद्यानात हळहळ व्यक्त केली जातेय. नॅशनल पार्कमधल्या टायगर सफारीमधला यश हा एक आकर्षणाचा बिंदू होता. गेल्या वर्षी यशला अत्यंत दुर्मिळ अशा कर्करोगाचं निदान झालं होतं.

संजय गांधी नॅशनल पार्कमधील डॉक्टर शैलेश पेठे यांनी गेल्या वर्षभरात यशवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या अशी माहिती दिली होती. यशला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा कर्करोग झाला होता. विविध प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवून या रोगाची निश्चिती करण्यात आली आणि त्यानुसार उपचारही करण्यात आले. कर्करोगामुळे त्याच्या खाण्यापिण्यात घट झाली होती तसंच त्याचं वजनही घटलं होतं. यश अकाली किंवा सरासरी वयाच्या आधीच म्हणजे अकरा वर्षांचा असताना कर्करोगाला बळी पडला आहे.

याच वर्षी मार्चमध्ये डॉ. वाकणकर, डॉ प्रज्ञा पेठे, डॉ मनिष पिंगळे व डॉ अजय देशमुख या तज्ज्ञांनी यशवर तीन तास चाललेली शस्त्रक्रिया केली व ट्युमरची गाठ काढली होती.

बोरिवली: संजय गांधी नॅशनल पार्कमधील 'बाजीराव' या सफेद वाघाचा मृत्यू

ह्याआधी 3 मे 2019 ला संजय गांधी उद्यानातील 'बाजीराव' ह्या पांढ-या वाघाचा मृत्यू झाला होता. बाजीरावचे वय 18 वर्ष असून तो उद्यानातील सर्वात वृद्ध वाघ होता.आधी बाजीराव आणि आता यश वाघाच्या जाण्याने वन्यप्रेमी फार दु:खी झाले आहेत.