e-cigarette ( Representational Image/ Picture credit: Flickr)

World No Tobacco Day: गुटखा, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांनंतर आता महाराष्ट्रामध्ये ई सिगारेटवरही बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न व प्रशासनाकडून तंबाखू इतकंच ई सिगारेटही हानिकारक असल्याचं सांगत त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ई सिगार, व्हॅप, ई हुक्का याच्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंबाखू खाण्याने होतो 'COPD' हा गंभीर आजार, जाणून घ्या ह्याची कारणे आणि दुष्परिणाम

5 मार्च दिवशी ई सिगारेटच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला होता मात्र लोकसभा निवडणूक 2019 च्या आचारसंहितेमुळे त्याची फार प्रसिद्धी करण्यात आली नाही. मात्र आता ही गोष्ट शिक्षेस पात्र ठरू शकतो. ई सिगारेटमुळेही कॅन्सर होऊ शकतो. असं एफडीएकडून संगण्यात आलं आहे.

ई सिगारेटमध्ये असणार्‍या लिक्विडमध्ये लेड, क्रोमियम, निकेल यासारखे घातक धातू असतात. त्यांचं सेवन धोकादायक असल्याने ई सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.