Women Set Ablaze In Nagpur: भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला भर चौकात जिवंत जाळले; नागपूर येथील धक्कादायक घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेला भर चौकात जिवंत जाळल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ही घटना नागपूरमधील (Nagpur) अंजुमन पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळील (Anjuman Polytechnic College) हल्दिरामसमोर शुक्रवारी (25 डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. त्यानंतर आरोपी फरार झाला. दरम्यान, पीडित महिलेला जळताना पाहून नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. तसेच त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान आज सकाळी (26 डिसेंबर) पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही अजनी येथील टाटा मोटर्स येथे नोकरी करत होत्या. दरम्यान, त्या शुक्रवारी ऑफिसचे काम आटपून घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना रस्त्यात एक तरूण आणि तरूणी यांच्यात वाद सुरु असल्याचे दिसले. यामुळे त्या या दोघांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याजवळ गेल्या. परंतु, समजावित असताना संतापलेल्या तरूणाने त्याच्याजवळ असलेल्या बाटलीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतले. त्यानंतर त्यांना पेटून देऊन दुचाकीवरून पसार झाला. दरम्यान, महिला रस्त्यावर पेटल्याची पाहून जवळील नागरिक तिच्या मदतीला धावून आले. त्यानंतर त्यांनी पाणी ओतून आग विझवली. तसेच पीडित महिलेला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वृत्तात दिले आहे. हे देखील वाचा-Mumbai: लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या पार्टनरकडून महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत अनेक प्रतत्न केले जात असताना नागपूर येथील घटनेने सर्वांनाच हादरून सोडले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तसेच याप्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीं पीडित महिलेचे नातेवाईक करत आहेत.