Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष
CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) पाहायला मिळत आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्यात विकेन्ड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूभीमर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeeray) यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा केली. या बैठकीमध्ये राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) लावायचा? यावर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे उद्या लॉकडाऊनबद्दल निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्थ खात्यासमवेत बैठक घेणार आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. वित्त मंत्री अजित पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? तसेच लॉकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी काय निर्णय घेता घेईल का? यावरही चर्चा केली जणार आहे. यामुळे उद्या उद्धव ठाकरे काय घोषणा करणार आहेत? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा-Lockdown करण्याआधी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्यावा, नीलम गो-हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. दरम्यान, महाराष्ट्राने आज (11 एप्रिल) विक्रमी नोंद केली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 421 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रात आज तब्बल 63 हजार 294 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 34 हजार 8 कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.65% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.