राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार? राजकीय चर्चांना उधाण
Radhakrishna Vikhe Patil | (फोटो सौजन्य-फेसबुक)

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी (National Congress Party) पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी 27 डिसेंबरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे विखे आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली आहे अशी गंभीर टीका यावेळी विखेंनी विरोधकांवर केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विखेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शुक्रवारी विखेंनी काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. यानंतर विखे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात का? असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे. यावर विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवून अशा प्रश्नांना पूर्णविराम लावला आहे. मी काँग्रेस पक्षात पुन्हा परतणार या बातम्यात काहीही तथ्थ नाही. या केवळ अफवा असून विरोधकांनी मला बदमान करण्याची सुपारी घेतली आहे. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संपर्क आहेत. त्यामुळे मी सार्वजनिक जीवनात कुणाला भेटायचे नाही का? राजकीय जीवनात आता कुणाशी संबधही ठेवायचे नाही का? असा संपप्त प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. हे देखील वाचा- वर्षा बंगल्यावरुन राजकारण तापले; लिहिणाऱ्यांचे तोंड काळे झाल्याची संजय राऊतांची टीका

दरम्यान, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या मागे कायम उभे राहणार. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे विखेंनी स्पष्ट केले. विखे पाटील यांनी स्वगृही परत येण्याचे ठरवले जरी असले तरी, त्यांच्या परतीच्या निर्णय हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरही अवलंबून असणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत. विशेष म्हणजे, विखे पाटील पक्षात परत यावे अशी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्नदेखील सुरू असल्याचे सांगितले जात आहे.