Suicide Case: पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीची आत्महत्या, आरोपी अटकेत
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एका 33 वर्षीय महिलेने गोरेगाव (Goregaon) येथील राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. कारण तिचा नवऱ्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. तसेच तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. तिच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे आरे पोलिसांनी (Aarey Police) पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) केली आहे. ही घटना 3 डिसेंबर रोजी मोहन गोखले रोडवरील नवभारत सोसायटीतील त्यांच्या राहत्या घरी घडली. रुपम ही महिला सुरक्षा एजन्सी चालवणारे पती अजितप्रताप सिंग यांच्यासोबत राहत होती. या दाम्पत्याला सहा वर्षांची मुलगी आहे. हेही वाचा Cyber Crime: आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डची ऑफर देत मुंबईतील व्यावसायिकाला घातला 4.20 लाखांचां गंडा

रुपमने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिला कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. रुपमचे वडील अरुण कुमार सिंग यांनी त्याच दिवशी आरे पोलिसात रुपमचा पती अजित याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला.  2007 मध्ये लग्न झाल्यापासून सिंग आपल्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.