Mumbai Goa Highway: नितीन गडकरी यांनी घेतला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा
Nitin Gadkari | (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई- गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway)चौपदरीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. कोकणासाठी (Konkan) अत्यंत महत्वाचा असलेला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना गडकरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीष म्हैसकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता संतोष शेलार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (Nitin Gadkari On Toll Exemption: 'महामार्गांवर प्रवास टोल फ्री होणारच नाही' मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ होतोय वायरल (Watch Video))

राज्यातील पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोप वे करीता निश्चित केलेल्या 40 ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश देतानाच राज्यातील 81 रस्ता प्रकल्पांच्या कामासाठी 1600 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, असेही नितीन गडकरी यांनी म्हणाले आहेत.

राज्यातून 40 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सहा ठिकाणच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी केंद्र सरकार देईल. राज्य शासनाने प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करुन द्यावी.